मार्गारेट चेझ स्मिथ
मार्गारेट मॅडेलिन चेझ स्मिथ (१४ डिसेंबर, इ.स. १८९७ - २९ मे, इ.स. १९९५)[१] ही अमेरिकेतील राजकारणी होती. ही अमेरिकेच्या सेनेटमधील सर्वप्रथम तसेच अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्झ आणि सेनेट दोन्हीवर निवडून गेलेली सर्वप्रथम स्त्री होती.[२][३]
मेन राज्यामधून रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून गेलेली चेझ स्मिथ ही मवाळ धोरणाची असून तिने जोसेफ मॅककार्थीवर टीका करण्यात पुढाकार घेतला होता.[४]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "संग्रहित प्रत". 2000-09-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-09-18 रोजी पाहिले.
- ^ "स्मिथ, मार्गारेट चेझ, (१८९७-१९९५)". Biographical Directory of the United States Congress (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सेनेटर मार्गारेट चेझ स्मिथ (१८९७-१९९५)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "जून १, १९५०: अ डेक्लरेशन ऑफ कॉन्शन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)