मार्क्सवादी स्त्रीवाद
अभिजात मार्क्सवाद आणि स्त्रीवाद् यांच्यातील परस्पर संबंधाबाबत विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. अर्थात मार्क्सवादातील पुढील काही आशय सुत्रांनी स्त्रीवादी आकलनात भर पाडली आहे : १. ऐतिहासिक विकासक्रम समजून घेण्यासाठी विचारांवर वा संकल्पनांवर नव्हे, तर लोकांच्या भौतिक कृतीवर विशेषतः उत्पादनाच्या क्रियेवर भर दिला आहे. २. माणूस स्वतः आपला इतिहास घडवत असतो. या संकल्पनांचा स्त्रीवादी आकलनावर प्रभाव पडला आहे. प्रामुख्याने कुटुंबातील शोषण ऐतिहासिक संदर्भात समजून घेणे शक्य झाले. [१]
संदर्भ
- ^ रेगे शर्मिला, मार्क्सवादी स्त्रीवाद् : एक संकल्पनात्मक् आढावा, वाटसरू१६ ते ३१ डिसेंबर २००४/वर्ष ४ थे अंक १६ वा.