मार्क्सवाद
कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांवरील लेखनातून मार्क्सवाद हा विचार पंथ निर्माण झाला.
मार्क्सवाद म्हणजे जर्मन लेखक कार्ल मार्क्स यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादास साम्यवाद असेही म्हणले जाते. मार्क्सवाद हा जगभर प्रसिद्ध आहे. तसेच जगातील अनेक देशांत मार्क्सवादावर आधारलेले राजकीय पक्ष आहेत. परंतु रशिया, चीन, व्हिएतनाम व इतर काही देशांत प्रमुख राजकीय पक्ष हे मार्क्सवादी आहेत. भारतात केरळमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षांचे राज्य अनेक वर्षे आहे/होते.
मार्क्सवादावरील मराठी पुस्तके
- कार्ल मार्क्स (व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. लेखक - रा.शे. साळुंके)
- कार्ल मार्क्स (सरला कारखानीस)
- कार्ल मार्क्सच्या आठवणी (अनुवादित, मूळ लेखक - विल्हेम लीब्क्नेष्ट; मराठी अनुवाद - तारा रेड्डी)
- बोल्शेविक पार्टीचा इतिहास (शं.वा. देशपांडे)
- मार्क्स काय म्हणाला ?(उदय नारकर)
- मार्क्सवादी साहित्यविचार (केशव शिरवाडकर)