Jump to content

मारुती दाजी देवकाते

मारुती दाजी देवकाते (१ जानेवारी, इ.स. १९४१ - १९ जानेवारी, इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी भाषेतील लेखक व मराठी चित्रपटसृष्टीतील संवाद लेखक, गीतकार, पटकथाकार होते. यांनी एकूण ४० वर्षांत सुमारे १५० चित्रपटाच्या पटकथा, संवादलेखन आणि गीतलेखन केले होते.

जीवन

मारुती दाजी देवकाते मूळचे पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या नीरा-वागज या गावचे होत.

कारकीर्द

चित्रपट

चित्रपटाचे नाववर्ष (इ.स.)भाषासहभाग
जन्म हा तुझ्यासाठीमराठीसंवादलेखन
जय तुळजाभवानीमराठीसंवादलेखन
जवळ ये लाजू नकोइ.स. १९७६मराठीगीतलेखन
डाळिंबीमराठीसंवादलेखन
थापाड्यामराठीसंवादलेखन
दैवत असेमराठीसंवादलेखन
पटलं तर व्हंय म्हणामराठीसंवादलेखन
पांडोबा पोरगी फसलीमराठीसंवादलेखन
पैजेचा विडामराठीसंवादलेखन
भटकभवानीमराठीसंवादलेखन
भन्‍नाट भानूमराठीसंवादलेखन
भाग्यवती मी या संसारीइ.स. १९७१मराठीगीतलेखन
भामटामराठीसंवादलेखन
रंगू बाजारला जातेमराठीसंवादलेखन
सूनबाई ओटी भरून जामराठीसंवादलेखन
सौभाग्यकंकणमराठीसंवादलेखन
हळद रुसली कुंकू हसलंइ.स. १९९१मराठीसंवादलेखन

प्रकाशित साहित्य

भगगवद्गीता व महाभारत या दोन ग्रंथांचे देवकाते यांनी अभंग स्वरूपात केलेले रूपांतर अनुक्रमे अभंगगीता व अभंग महाभारत या नावाने प्रकाशित झाले आहे.

साहित्यकृतीचे नाववर्ष (इ.स.)साहित्यप्रकारभाषाप्रकाशन
आता तुझी पाळीमराठीसुकृत प्रकाशन
कसेल त्याची जमीनइ.स. २००९मराठी
कळप मिळाला मेंढरालामराठीप्रतीक प्रकाशन, पुणे
किळसइ.स. १९६७मराठीतीरंदाज प्रकाशन
गीत भीमाचे गाऊ यामराठीसुगावा प्रकाशन
थापाड्यामराठीसुकृत प्रकाशन
दामिनीमराठीसुगावा प्रकाशन
दुभंगमराठीत्रिनेत्र प्रकाशन
बळीचा बकरामराठीसुपर्ण प्रकाशन
बुरखाइ.स. २००८मराठीत्रिनेत्र प्रकाशन
बूमरॅंगमराठीनंदादीप बुक सर्व्हिसेस
महात्मा जोतिबा फुलेमराठीप्रतीक प्रकाशन, पुणे
रॅगिंगमराठीसुकृत प्रकाशन
रात्र पेटली अंधारानेमराठीत्रिनेत्र प्रकाशन

मा.दा. देवकाते यांचे रचलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली प्रसिद्ध गीते

  • आली आली हो गोंधळाला... गोंधळाला आई (गायक - मल्लेश)
  • गणराजाला करू मुजरा (संगीत - राम कदम; गायक - छोटा गंधर्व; चित्रपट - पुढारी]]
  • तुझी साथ हवी रे रोज (संगीत - बाळ पळसुले; गायक - आशा भोसले, सुरेश वाडकर; चित्रपट - डाळिंबी)
  • पावना पुन्याचा आलाय्‌ गं (संगीत - विठ्ठल शिंदे; गायिका - सुलोचना चव्हाण)
  • मला म्हणत्यात हो पुण्याची मैना (संगीत - विठ्ठल शिंदे, गायिका - रोशन सातारकर)
  • माणसा रे माणसा ठेव
  • सांग सजणा सांग मला रे
  • हे गणनायक सिद्धीविनायक
  • हे शिवशंकर गिरिजा

संकीर्ण

ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे इ.स. १९७५पासून सक्रिय सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर बारामती येथे भरलेल्या नवोदित मराठी साहित्य संमेलनासाठी वसंतराव पवार नाट्यगृहाचे रूपांतर "मा .दा .देवकाते साहित्यनगरी" असे करण्यात आले होते.

बाह्य दुवे

  • "मारुती दाजी देवकाते यांनी लिहिलेली गाणी".