मारवाडी भाषा
मारवाडी | |
---|---|
राजस्थानि | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | राजस्थान, गुजरात, हरियाणा |
लोकसंख्या | २.२ कोटी |
बोलीभाषा | मारवाडी |
भाषाकुळ | |
लिपी | देवनागरी |
भाषा संकेत | |
ISO ६३९-२ | mwr |
ISO ६३९-३ | mwr |
मारवाडी ही भारत देशामधील राजस्थानी भाषेची एक बोली आहे. मारवाडी भारताच्या राजस्थान व गुजरात राज्यांत बोलली जाते. पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये देखील मारवाडी भाषक आढळतात. जिथे जिथे मारवाडी लोक व्यापारासाठी जातात तिथे तिथे ते आपआपसात मारवाडीतून संभाषण करतात. महाराष्ट्रातही भरपूर मारवाडी आहेत.दाल बाटी चुरमा हे यान्चे मुख्य जेवण आहे.घुमर ,गरबा,दांडिया हे नृत्य प्रकार आहेत. राजस्थान मधुन मारवाडी लोक विविध जागी व्यापारासाठी स्थलांतर झालेत.
राजस्थान मारवाड प्रदेशात व बिकानेर शहरामध्ये मारवाडीचा वापर विशेषतः पाहण्यात येतो. मात्र भारताच्या घटनेने मान्यता दिलेल्या २३ अधिकृत भाषांत मारवाडीचा समावेश होत नाही.