Jump to content

माया धुप्पड

माया दिलीप धुप्पड या एक मराठी कवयित्री आणि बालसाहित्य लेखिका आहेत.

कौटुंबिक माहिती

त्या जळगाव येथे राहतात. जळगावच्या स.नं. झंवर विद्यालयात त्या शिक्षिका होत्या. त्यांचे माहेर पुण्याजवळ राजगुरुनगरचे आहे. येथील विठ्ठल, राम यांच्या मंदिरांतीलकाकडा, कीर्तन, भजन, हरिनामाचा गजर, नागपंचमीचा फेर, भोंडले यांचा धुप्पड यांच्यावर प्रभाव पडला. लग्नानंतर त्यांनी लेखन सुरू केले.

पुस्तके

  • चांदणसांज (कवितासंग्रह)
  • पावसाची राणी (बालकविता संग्रह)
  • मनमोर (कवितासंग्रह)
  • वाऱ्याची खोडी (बालकविता संग्रह)
  • सावल्यांचं गाव (बालकविता संग्रह)
  • सोनचांदणं (कवितासंग्रह)

पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा बालकवी पुरस्कार (२००५)
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे बाबूराव शिरोळे पुरस्कार (२०१७)
  • जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे, (स्व.) सौ. बदामबाई हेमराज देसर्डा, प्रा. पन्नालाल भंडारी, इंदरचंद लालचंद देसर्डा यांच्या स्मरणार्थ सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार
  • ‘सावल्यांचं गाव’ या बालकविता संग्रहासाठी पार्वताबाई आव्हाड उत्कृष्ट बालवाड्मय पुरस्कार (११-६-२०१७)