मायक्रोसॉफ्ट वर्ड
मायक्रोसॉफ्ट वर्ड (इंग्लिश: Microsoft Word;) हे एक लेखन-संपादन कामकाजाचे उपयोजन सॉफ्टवेर आहे. हे सॉफ्टवेर मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन कंपनीने विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी बनवलेले व वितरलेले आहे. हे सॉफ्टवेर इ.स. १९८३ साली मल्टी-टूल वर्ड या नावाने झेनिक्स संगणक प्रणाल्यांसाठी बाजारात आणलेल्या लेखन-संपादन सॉफ्टवेरापासून उत्तरोत्तर विकसत गेले आहे. त्याची सर्वांत ताजी आवृत्ती मायक्रोसॉफ्ट वर्ड २०१६ ही आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये विनवर्ड हे पॅकेज वर्ड प्रोसेसर म्हणून दिले आहे.
बाह्य दुवे
- मायक्रोसॉफ्ट वर्ड अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)