Jump to content

मायकेल डुकाकिस

मायकेल स्टॅनली डुकाकिस (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३:ब्रुकलाइन, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - ) हा अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्याचा भूतपूर्व गव्हर्नर आहे. हा १९७५ ते १९७९ आणि १९८३ ते १९९१ दरम्यान गव्हर्नरपदी होता. हा १९८८तील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार होता परंतु तो जॉर्ज एच. डब्ल्यू. बुशकडून पराभूत झाला.