Jump to content

मानस सरोवर

मानस सरोवर

मानस सरोवर(अपभ्रंश - मान सरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे.

भौगोलिक माहिती

मानस सरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटरवर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानस सरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. सरोवराचा घेरा ८८ किमी, खोली ९० मीटर तर क्षेत्रफळ ३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. मानस सरोवराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (ही तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे.

सांस्कृतिक महत्त्व

कैलाश पर्वताप्रमाणे, मानस सरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानस सरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानस सरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे).

मराठी लेखिका कै.सत्त्वशीला सामंत यांच्या मते याचे अचूक नाव मानस सरोवर असून याबद्दल त्यांनी भारत सरकारला अनेक पुरावे दिले आहेत. भारत सरकारने यावर त्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.[] येथे आहे.

धार्मिक बाजू

हिंदू धर्मात हे पवित्र मानले जाते. हजारो लोक त्याच्या तत्त्वज्ञानासाठी दरवर्षी कैलास मानसरोवर यात्रेमध्ये भाग घेतात. हिंदू विचारसरणीनुसार हा तलाव प्रथम भगवान ब्रह्माच्या मनात जन्मला. मानसरोवर हा संस्कृत शब्द मानस आणि सरोवर यांच्या जोडीने बनला आहे ज्याचा शब्दशः अर्थ 'मनाचा सरोवर' आहे. येथे सती देवीच्या शरीराचा उजवा हात पडला. म्हणूनच, दगडी दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते. येथे एक शक्तीपीठ आहे.

हे बौद्ध धर्मात देखील पवित्र मानले जाते. असे म्हणले जाते की राणी मायाची ओळख येथे भगवान बुद्धाशी झाली होती.

जैन धर्म आणि तिबेटचे स्थानिक बोन्पा लोकही ते पवित्र मानतात.

या तलावाच्या काठावर अनेक मठ आहेत.

वाङ्मयात मानस सरोवर

संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानस सरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे.

मानस सरोवरावरील मराठी पुस्तके

  • आगळी वेगळी कैलास मानस सरोवर यात्रा (डॉ. अजित कुलकर्णी)
  • परिक्रमा : यात्रा कैलास पर्वत आणि मानस सरोवर (गोपाळ भागवत)
  • मनोरथा चल त्या नगरीला (डॉ. कल्याणी नामजोशी)

मानस सरोवरावरील मराठी गीते

  • भूमिकन्या सीता या नाटकातले ग.दि. माडगूळकर यांचे ’मानसी राजहंस पोहतो’. - ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या पहाडी रागातल्या या गीताला स्नेहल भाटकर यांनी संगीत दिले आहे.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.lokprabha.com/20130705/shabdarang.htm लोकप्रभातील लेख