मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या जमाती
ज्या स्वेच्छेने किंवा काही परिस्थितींमुळे आधुनिक नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिल्या किंवा रहात आहेत अशा मानवी संस्कृतीपासून अलिप्त राहिलेल्या काही जमाती आहेत. त्यांना हरवलेल्या किंवा अलिप्त जमाती असेही म्हणतात. नागर संस्कृतीपासून पूर्णपणे अलिप्त राहिले आहेत अशा अतिशय कमी संख्येत असणाऱ्या लोकांशी संपर्क न साधता त्यांना स्वतंत्रपणे जगू द्यावे, असे काही एतद्देशीय हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसे न केल्यास ते त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काचे उल्लंघन होईल, असे त्यांचे मत आहे. [१] बहुतेक अलिप्त जमाती दक्षिण अमेरिका, न्यू गिनी, भारत व मध्य आफ्रिका या भागातील घनदाट वनप्रदेशात राहतात. या जमातींच्या अस्तित्वासंबंधीची माहिती ही मुख्यत: शेजारील जमातीच्या लोकांशी अनवधानाने झालेल्या संपर्काने किंवा कधी कधी हिंसक चकमकीतून आणि हवाई फुटेजमधून मिळते. अशा जमातीतील लोकांमध्ये सामान्य रोगांची प्रतिकारशक्ती कमी असू शकते किंवा नसूही शकते. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधल्यास रोगराईने त्यांच्यातील अनेक लोक दगावू शकतात.[२][३]
इतिहास
आधुनिक
बाहेरील जगात अलिप्त जमाती हा आकर्षणाचा विषय आहे. पण त्यासाठी पर्यटन दौरे आयोजित करून अलिप्त जमातींना शोधण्यासाठी विशेष साहसी दौरे आयोजित करणे हे मात्र वादग्रस्त झाले आहे.
आशिया
अंदमान बेटे, भारत
अंदमान बेटांवरील दोन जमातींनी बाहेरील जगाशी संपर्क टाळला आहे.
सेंटिनेली लोक
दक्षिण अंदमान बेटांच्या पश्चिमेकडील उत्तर सेंटिनेल बेट नावाच्या एका छोट्या आणि दुर्गम बेटावर राहणारे सेंटिनेलीज लोक अजूनही सक्रियपणे आणि हिंसकपणे बाहेरील जगाचा संपर्क नाकारतात. त्यांची लोकसंख्या अंदाजे ४० ते ५०० इतकी कमी आहे. २००४ च्या हिंदी महासागरातील त्सुनामीनंतर केलेल्या एका हेलिकॉप्टर सर्वेक्षणामध्ये सेंटिनेलीज लोक बचावल्याचे समोर आले.
सेंटिनेलीज लोक त्या बेटावर ६०,००० वर्षांपासून रहात असल्याचा अंदाज आहे. त्यांची भाषा अंदमान बेटांवरील इतर भाषांपेक्षा खूप वेगळी आहे.[४] यामधून असे सूचित होते की, हे लोक हजारो वर्षांपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे या लोकांना सर्वाधिक अलिप्त राहिलेले लोक समजले जाते आणि पुढेही समजले जाईल.[४]
जरावा
जरावा जमातीचे लोक अंदमानच्या एका मुख्य बेटावर राहतात. त्यांनीही जगाशी संपर्क टाळला आहे, पण १९९७ मध्ये त्यांच्या प्रदेशामधून जाणाऱ्या हमरस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर काहीजण वनांमधून बाहेर येऊ लागले आहेत. त्यांची लोकसंख्या अंदाजे ३०० आहे.
व्हिएतनाम
व्हिएतनाम युद्धाच्या वेळी उत्तर व्हिएतनामीज सैनिकांचा, व्हिएतनामच्या रुक लोकांशी पहिल्यांदा संपर्क आला होता. हे लोक तेव्हा पूर्व कुआंग बिन्ह प्रांताच्या गुहांमध्ये रहात होते. युद्धानंतर व्हिएतनाम सरकारने त्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रयत्न केले. [५]
महासागरी
ऑस्ट्रेलिया
इ.स. १९८४ मध्ये "पिंटुपी" लोकांच्या एका गटाचा पश्चिम ऑस्ट्रेलियातील गिबसन वाळवंटापर्यंत मागोवा घेण्यात आला. हे लोक पारंपारिक शिकाऱ्याची जीवनशैली जगत होते. त्यांचा पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन समाजातील लोकांशी संपर्क आला होता. हे लोक ऑस्ट्रेलियातील शेवटची अलिप्त जमात आहे असे मानले जाते.[६]
न्यू गिनी
पापुआ न्यू गिनीचा बराचसा भाग डोंगराळ आणि अतिशय घनदाट जंगलांचा असल्याने आजही अस्पृष्ट आहे. तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना माहीत आहे की तिथे काही अलिप्त जमाती आहेत, पण त्या आधुनिक शिक्षण, वैद्यकीय सुविधा, तंत्रज्ञानापासून वंचित आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या जातींची नावे आणि त्यांच्याबद्दलची माहिती मिळवणे अतिशय कठीण आहे.
इंडोनेशियाच्या न्यू गिनी बेटांवरील पापुआ आणि पश्चिम पापुआ प्रांतांमध्ये अंदाजे ४४ अलिप्त जमाती आहेत.[७] पूर्व इंडोनेशियाच्या बेटांवरही काही अलिप्त जमाती असल्याची नोंद आहे.
अलिप्त जमाती पुढील प्रदेशांमध्ये आढळतात:[८]
- गुसावी
- लेंग्गुरू
- कोकिरि
- देरेवो
- तेरिकु
- फोजा
- मनु
- वरुता
- ब्राझा-डिगुल
दक्षिण अमेरिका
बोलिव्हिया
बोलिव्हियामध्ये २००६ पर्यंत पाच अलिप्त जमातींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे आणि आणखी तीन अलिप्त जमाती असल्याचे मानले जाते. ज्यांच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यात आली आहे असे गट पुढीलप्रमाणे आहेत: का-ल्या राष्ट्रीय उद्यानातील अयोरिओ जमात, युकुई संरक्षित क्षेत्रातील युकुई लोक, सांता क्रुज विभागातील युराकारे, चाकोबो संरक्षित क्षेत्रातील पकाहुआरा आणि मदिदि राष्ट्रीय उद्यानातील टोरोमोना जमात. २००५ मध्ये बोलिव्हियाने बेलेमच्या घोषणापत्रावर सही केली आणि अलिप्त जमातीतील लोकांचे मूलभूत हक्क मान्य केले.
ब्राझील
१८ जानेवारी, २००७ रोजी एफ.यु.एन.ए.आय. या संस्थेने ब्राझीलमध्ये ६७ अलिप्त जमातींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले.[९] त्यामुळे जगातील सर्वाधिक अलिप्त जमाती असलेल्या प्रदेशांमध्ये ब्राझीलने न्यू गिनीच्या एका बेटाला मागे टाकले आहे.
कोलंबिया
इक्वेडोर
फ्रेंच गयाना
गयाना
पेराग्वे
पेरू
सुरिनाम
व्हेनेझुएला
संदर्भ
- ^ नूवर, रेचेल. "फ्यूचर– ॲंथ्रोपोलॉजी: द सॅड ट्रुथ अबाऊट अनकॉन्टॅक्टेड ट्राइब्स" (इंग्रजी भाषेत).
- ^ "आयसोलेटेड ट्राईब स्पॉट्टेड इन ब्राझील" (इंग्रजी भाषेत).
- ^ ॲडम्स, गाय. "क्लोज कॅमेरा एन्काउंटर विथ 'अनकॉन्टॅक्टेड' पेरूव्हिअन ट्राईब" (इंग्रजी भाषेत).
- ^ a b "द मोस्ट आयसोलेटेड ट्राईब इन द वर्ल्ड?" (इंग्रजी भाषेत). 2019-10-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Sự thật về những cơn đói của đồng bào Rục" (व्हिएतनामीज भाषेत). १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) ("चुत लोकांची उपासमार") - ^ "कोलायडिंग वर्ल्ड्स्: फर्स्ट कॉंटॅक्ट इन द वेस्टर्न डेझर्ट (Colliding worlds: first contact in the western desert, 1932-1984)" (इंग्रजी भाषेत). ३ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बीबीसी: फर्स्ट कॉंटॅक्ट विथ आयसोलेटेड ट्राईब्स? (BBC: First contact with isolated tribes?)". ०३-०४-२०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "व्हेअर आर दे? (Where are they?)" (इंग्रजी भाषेत). 2019-10-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ०३-०४-२०१६ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ रेमंड कोलिट. "ब्राझील सीस् ट्रेसेस ऑफ मोर आयसोलेटेड ॲमॅझॉन ट्राईब्स" (इंग्रजी भाषेत). 2015-07-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. October 19, 2014 रोजी पाहिले.