मानवी प्रजननसंस्था
सर्व सजीवांमधे आढळणारी 'प्रजनन' ही एका जीवापासून नवीन जीव निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढgjggtgyfcbjinvddळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जनुकीय द्रव्यांचे संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधjcghjbdsर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे gf vhकाम करणाऱ्या सर्व अgvfdgnniiवयवांची मिळून मानवी प्रजननसंस्था बनली आहे [१] बनते. काही द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.
मानवात नर म्हणजे पुरुष व मादी म्हणजे स्त्री अशा भिन्नलिंगी व्यक्ती असतात आणि फक्त लैंगिक प्रकारानेच प्रजनन होते. मानवी वाढ व विकासातील [पौगंडावस्था|पौगंडावस्थेत] व्यक्तीचा पुरुष किंवा स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक विकास होतो. त्यामधे लैंगिक प्रजननाला आवश्यक अवयवांचा पूर्ण विकास होऊन व्यक्ती तरुण पुरुष किंवा स्त्री म्हणून प्रजननक्षम होते. पुरुषाच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून पुरुष प्रजननंस्था बनते आणि स्त्रीच्या प्रजननाला आवश्यक आणि लैंगिक अवयवांची मिळून स्त्री प्रजननंस्था बनते.
लैंगिक प्रजनन
दोन एकगुणित युग्मकांच्या संयोगातून द्विगुणसूत्री युग्मनज अशा जीवाची उत्पत्ति म्हणजे लैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजनामध्ये पुरुषात प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाने[२] एकगुणित ‘पुंयुग्मक’ किंवा ‘शुक्रजंतू’ तयार होतो आणि स्त्रीमधेही त्याचप्रमाणे प्राथमिक बीजांडजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाने एकगुणित ‘स्त्रीयुग्मक’ किंवा ‘बीजांड’ तयार होते व त्यांच्या संयोगाने द्विगुणसूत्री युग्मनज (फलित बीजांड) तयार होते. या प्रक्रियेस फलन असे म्हणतात व त्यातून नवीन मानवी जीव (गर्भ) निर्माण होतो.
शुक्रजंतू पुरुषाचा (पित्याचा) आणि बीजांड स्त्रीचा (आईचा) जनुकीय वारसा घेऊन येतात. फलित बीजांडात ही दोन्ही युग्मके एकत्र आल्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या आनुवंशिकतेने आलेल्या असतात आणि जनुकांची देवाणघेवाण होऊन जनुकीय द्रव्यामध्ये विविधता येते. यामुळे जनुकीय दोष कमी असलेला व अधिक सक्षम नवा जीव निपजतो.
पुरुषाच्या वृषणात निर्माण झालेल्या शुक्रजंतूंचे रेताशयात पोषण होते. रेताशय व अष्टीला ग्रंथीतील स्राव व हे शुक्रजंतू यांचे वीर्य बनते. संभोगाचे वेळी पुरुषाचे शिश्न स्त्रीच्या योनीत प्रवेश करते व वीर्यस्खलनाचे वेळी वीर्य योनीत सोडले जाते. त्यातील काही भाग गर्भाशयमार्गे बीजांडवाहिनीत पोचतो. बीजांडकोषातून उत्सर्जित झालेल्या व बीजांडवाहिनीत पोचलेल्या बीजांडाशी वीर्यातील शुक्रजंतूचा संयोग होऊन बीजांड फलित होते (फलन). फलित बीजांड (गर्भ) गर्भाशयात रुजतो व तेथे त्याची वाढ होते (गर्भारपण). प्रसूतीच्या वेळी गर्भ गर्भाशयातून योनीवाटे बाहेर पडून बाळाचा जन्म होतो. स्तनांतून स्रवणाऱ्या दुधावर पुढे काही काळ त्याचे पोषण होते.
याप्रमाणे युग्मके (शुक्रजंतू व बीजांड) निर्माण करणाऱ्या, त्यांचे पोषण करणाऱ्या, त्यांना एकमेकांकडे वाहून नेणाऱ्या, त्यांना एकत्र आणणाऱ्या, फलनानंतर नवीन जीव रुजवून त्याचे पोषण करणाऱ्या, त्याला बाह्य जगात तग धरू शकेल इतक्या प्रगल्भतेच्या अवस्थेपर्यंत वाढवणाऱ्या, त्याला योग्य वेळी बाह्य जगात सोडणाऱ्या आणि पुढे काही काळ त्याचे पोषण करणाऱ्या सर्व सहभागी अवयवांची व यंत्रणेची मिळून मानवी प्रजननसंस्था बनते.
प्रजननसंस्थेतील हे अवयव व ही यंत्रणा पुरुष व स्त्रीमधे अर्थातच वेगवेगळी असते. तिला अनुक्रमे पुरुष प्रजननसंस्था आणि स्त्री प्रजननसंस्था असे म्हणतात.
पुरुष प्रजननसंस्था
शुक्राणू तयार करणे, त्यांचे पोषण करून त्यांना कार्यक्षम राखणे, योग्य त्या वेळी त्यांचे वहन करणे आणि समागमाच्या वेळी स्त्री जनन संस्थेमध्ये त्यांचे क्षेपण करणे यासाठी पुरुष प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
अवयवांची रचना व कार्य
पुरुष प्रजननसंस्थेमध्ये[३] काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश पुरुष प्रजननसंस्थेत होतो.
अंतर्गत पुरुष जननेंद्रिये
(वृषणे बाहेरून दिसत असली तरी वृषणाची निर्मिती आणि विकास उदरपोकळीत होत असल्याने त्यांचे वर्णन इथे केले आहे.) मानवी वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणामधील रेतोत्पादक नलिकांमध्ये शुक्रजनन पेशी आणि ’सर्टोली’ पेशी असतात. शुक्रजनन पेशींपासून आद्यशुक्रजंतू तयार होतात. शुक्रजंतूंच्या पोषणासाठी व परिवहनासाठी आवश्यक द्रव ’सर्टोली’ पेशींपासून निर्माण होतो. रेतोत्पादक नलिकांमधल्या जागेतील अंतराली ऊतकातील ’लायडिग’ पेशी ’पौरुषजन’ टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या संप्रेरकाची निर्मिती करतात. याप्रमाणे शुक्रजंतूंची निर्मिती करणारी प्रजननग्रंथी आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करणारी अंतःस्रावी ग्रंथी असे दुहेरी कार्य वृषण करते.
अधिवृषण: वृषणाच्या मागील व वरील बाजूस अधिवृषण असते. ही घट्ट गुंडाळी केलेली लांब नलिका असते. वृषणाच्या मागच्या भागातून बाहेर पडणाऱ्या नलिकांतून शुक्रजंतू अधिवृषणात प्रवेश करतात. येथे शुक्रजंतूंचा पुढील विकास होतो व ते रेतोवाहिनीत प्रवेशतात.
रेतोवाहिनी
अधिवृषणाच्या खालच्या टोकपासून ही नलिका सुरू होते. रेताशय व अष्ठीला ग्रंथीतून पुढे गेल्यावर तिचे स्खलनवाहिनीत रूपांतर होते. अधिवृषणामधील शुक्राणू पुढे सरकून रेतोवाहिनीमध्ये साठून राहतात.
रेताशय
मूत्राशयाच्या खाली, दोन्ही रेतोवाहिन्यांच्या शेजारी दोन रेताशय असतात. वीर्याचा 70 ते 85 % भाग रेताशयातील स्रावांचा असतो. त्यामधे प्रथिने काही उत्प्रेरके, श्लेश्म इत्यादीबरोबर क जीवनसत्त्व आणि फ्रक्टोज शर्करा असते. फ्रक्टोज शुक्रजंतूंना ऊर्जा पुरवते.
स्खलन वाहिनी: रेताशयातून निघणारी वाहिनी त्या बाजूच्या रेतोवाहिनीला मिळून स्खलन वाहिनी बनते. दोन्ही बाजूच्या स्खलन वाहिन्या अष्ठीला ग्रंथीत शिरून तिच्यातून जाणाऱ्या मूत्रवाहिनीला मिळतात. समागमाच्या वेळी स्खलनवाहिन्यांतून वीर्य मूत्रनलिकेत व तिथून शिश्नावाटे स्त्री जननेंद्रियामध्ये सोडले जाते.
अष्ठीला ग्रंथी
वीर्याचा 20 ते 30 % भाग अष्ठीला ग्रंथीमधील स्त्रावांचा असतो. त्यात प्रथिने, उत्प्रेरके, शर्करा व इतर पदार्थांबरोबर झिंकही असते. हा स्राव आणि रेताशयातील स्राव शुक्रजंतूंबरोबर मिसळून वीर्य तयार होते. अष्ठीला ग्रंथीमध्ये फायब्रिनोजेन हे गोठण द्रव्यही असते.
मूत्रनलिका: उत्सर्जन-प्रजनन संस्थेतील ही अंतिम नलिका आहे. वीर्य व मूत्र उत्सर्जनाचा हा समाईक मार्ग आहे.
कंदमूत्रमार्ग ग्रंथी (Bulbourethral gland) (काउपर ग्रंथी - Cowper's gland): ह्या दोन ग्रंथी शिश्नाच्या मुळाशी, मूत्रमार्गाच्या पाठीमागे दोन बाजूंना असतात. यांतील स्राव बुळबुळीत व श्लेष्मल असतो. लैंगिक उत्तेजनेच्या वेळी हा स्राव दोन नलिकांवाटे मूत्रमार्गात टाकला जातो. त्यामुळे संभोग सुलभ होतो. याच प्रकारच्या व हेच कार्य करणाऱ्या ग्रंथी स्त्रीमधेही आढळतात (बार्थोलिन ग्रंथी)
अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या अनेक संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे -१२ च्या सुमारास मेंदूमधील अग्र पोषग्रंथीमधून (Pituitary gland) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) स्रवण्यास सुरुवात होते व त्यामुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते. पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे प्राथमिक शुक्रजनन पेशीच्या अर्धसूत्री विभाजनाला चालना मिळते आणि शुक्रजंतू निर्मितीसाठी आवश्यक विशिष्ट प्रथिननिर्मिती करण्यासाठी 'सर्टोली' पेशीं उत्तेजित होतात. तसेच पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे वृषणामधील अंतराली उतकामधील 'लायडिग' पेशींमधून टेस्टोस्टेरोन हे पुरुषसंप्रेरक स्रवते. टेस्टोस्टेरोनमुळे सर्व जननेंद्रियांची वाढ होते आणि ती कार्यान्वित होऊन पुरुषाचा लैंगिक विकास पूर्ण होतो.
याशिवाय लैंगिक अवयव व मुख्यतः दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाला अवटु व अधिवृक्क या अंतःस्रावी ग्रंथीचेही सहाय्य होते.
बाह्य पुरुष जननेंद्रिये
पुरुष प्रजजन संस्थेमधील बाहेरून दिसणारी प्रमुख इंद्रिये म्हणजे शिस्न, वृषणकोश आणि वृषण. त्यांपैकी वृषणाची माहिती 'अंतर्गत पुरुष जननेंद्रिये' येथे दिली आहे.
हे संभोगाचेपुरुषाच्या शिश्नामध्ये हाड किंवा स्नायू नसतात. शिश्न हे कॉर्पोरा कॅवर्नोझा पुरुषाच्या शिश्नामध्ये हाड किंवा स्नायू नसतात. शिश्न हे कॉर्पोरा कॅवर्नोझा ...
लिग उत्थानक्षम पुरुष इंद्रिय आहे. ओटीपोटाच्या खाली चिकटलेले मूळ, दंडगोलाकृती मध्यभाग आणि टोकाशी शिस्नमणी असे शिश्नाचे तीन भाग असतात. शिश्नाच्या दंडगोलाकृती भागामध्ये स्पंजासारख्या सच्छिद्र उतीच्या बनलेल्या तीन दंडगोलाकृती कांडया असतात. त्यांपैकी खालच्या कांडीतून मूत्रनलिका जाते व शिश्नमण्याच्या टोकावर उघडते. या नलिकेतून मूत्र आणि वीर्य यांचे वहन होते. सच्छिद्र उतीच्या दंडगोलाकृती कांडया उत्थानक्षम असतात. संभोगाचे वेळी त्यांच्यात रक्त साठून त्यांचे आकारमान वाढते व त्या ताठ होतात. त्यामुळे शिश्न ताठ व योनीमार्गात प्रवेश करण्यासाठी सिद्ध होते. संभोगाचे वेळी शिश्नावाटे वीर्य स्त्री जननेंद्रियामध्ये क्षेपित केले जाते. शिश्नावर सैल त्वचावरण असते व ते शिश्नमण्यावर दुहेरी घडीच्या स्वरूपात पसरलेले असते. ही त्वचेची घडी व शिश्नावरील त्वचा सैल असल्याने शिश्नाचा आकार मोठा झाला तरी ती शिश्नास सामावून घेते.
वृषणकोश
शिश्नाच्या खालील बाजूस असलेली त्वचा व स्नायूंची सैल पिशवी म्हणजे वृषणकोश. वृषणकोशामध्ये दोन वृषणे असतात. वृषणांचे संरक्षण करणे व त्यांचे तापमान नियंत्रित करणे ही कामे वृषणकोश करतो. वृषणामध्ये शुक्रजंतू निर्मितीचे कार्य शरीराच्या तापमानापेक्षा थोड्या कमी तापमानास सुरळीतपणे होते. वृषणकोशाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्नायूमुळे (क्रेमास्टर स्नायू - Cremaster muscle) वृषणकोश सैल किंवा आकसलेले राहण्यास मदत होते. थंडीमध्ये वृषणकोश आकसून वृषणे शरीराजवळ उबदार ठेवली जातात तर उन्हाळ्यात ती शरीरापासून थोडी दूर लोंबती ठेवल्यामुळे थंड राहतात. यामुळे वृषणाचे तापमान आवश्यकतेनुसार नियंत्रित होते. अति घट्ट अंतर्वस्त्रे वापरल्याने वृषणकोशाचे तापमान शरीराएवढे होते आणि शुक्रजंतू निर्मितीमध्ये अडथळा येतो. शुक्रजंतूंची संख्या कमी होण्याचे हे एक कारण आहे.
स्त्री प्रजननसंस्था
बीजांड तयार करणे, त्याचे वहन करणे, संभोगाचे वेळी प्रवेश केलेल्या शुक्रजंतुंबरोबर त्याचा संयोग घडवून त्याचे फलन करणे, फलित बीजांडाचे (गर्भाचे) पोषण करणे, योग्य वेळी प्रसूती घडवून बाह्य जगात टिकाव धरू शकणारे अर्भक जन्माला घालणे आणि त्याला स्तनपान देऊन त्याचे पुढे पोषण करणे यासाठी स्त्री प्रजनन संस्था आणि त्यातील अवयव विकसित झालेले असतात.
बालक स्त्रीलिंगी जन्मलेले असले तरी कुमारावस्थेपर्यंत जननेंद्रीयांची फारशी वाढ झालेले नसते. पौगंडावस्थेत पोष ग्रंथी व बीजांडकोशांतून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या प्रभावामुळे जननेद्रियांमध्ये झपाट्याने बदल होऊन ती विकसित होतात.
अवयवांची रचना व कार्य
स्त्री प्रजननसंस्थेमध्ये[४] काहीं इंद्रिये बाहेरून दिसणारी (बाह्य) व काही शरीरांतर्गत असतात. तसेच त्यांच्या विकासात व कार्यात अनेक अंतःस्रावी ग्रंथींचाही सहभाग असल्याने त्यांचाही समावेश स्त्री प्रजननसंस्थेत होतो.
अंतर्गत स्त्री जननेंद्रिये
स्त्री प्रजनन संस्थेमधील बाहेरून न दिसणाऱ्या इंद्रियामध्ये बीजांडकोश, बीजांडवाहिनी, गर्भाशय आणि योनी यांचा समावेश होतो.
गर्भाशयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक असे दोन बीजांडकोश श्रोणिगुहेमध्ये असतात. त्यांमध्ये सर्वसाधारणपणे दरमहा एक याप्रमाणे बीजांडे तयार होतात. बीजांडांची निर्मिती आणि उत्सर्जन पोष ग्रंथीमधील पुटक उद्दीपक संप्रेरक व पीतपिंडकारी संप्रेरक यांच्या प्रभावाखाली होते. त्याचप्रमाणे बीजांडकोशातून ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्रवतात. या संप्रेरकांमुळे गर्भाशयातील अंतःत्वचा फलित बीजांडाच्या रोपणासाठी सज्ज करणे, फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण, गर्भारपण आणि मासिक पाळी यांचे नियंत्रण होते.
याप्रमाणे बीजांडांची निर्मिती करणारी प्रजननग्रंथी आणि ईस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या अंतःस्रावांची निर्मिती करणारी अंतःस्रावी ग्रंथी असे दुहेरी कार्य बीजांडकोश करते.
दोन्ही बीजांडकोशांजवळ प्रत्येकी एक बीजांडवाहिनी असते. या नलिकेचे मोकळे तोंड बीजांडकोशाजवळ असते आणि दुसरे टोक गर्भाशयाला जोडलेले असून गर्भाशयात उघडते.
बीजांडकोशातून श्रोणीगुहेत मुक्त झालेले बीजांड बीजांडवाहिनीच्या बीजांडकोशाच्या जवळील मोकळ्या तोंडाकडून ग्रहण केले जाते आणि तिच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडाचे बीजांडवाहिनीतच फलन होते. फलित किंवा फलन न झालेले बीजांड शेवटी गर्भाशयात जाते. फलित बीजांडाचे गर्भाशयात रोपण होते. फलन न झालेले बीजांड मासिक स्रावाबरोबर शरीराबाहेर टाकले जाते.
श्रोणिगुहेत दोन्ही बाजूंच्या बीजांडवाहिन्या आणि योनी यांच्या मधे गर्भाशय असते. ही स्नायूंची जाड पिशवी असून आतील पोकळी अरूंद फटीसारखी आणि त्रिकोनी असते. त्याच्या दोन टोकांना बीजांडवाहिन्या जोडलेल्या असतात आणि त्या गर्भाशयपोकळीत उघडतात. त्याच्या खालच्या निमुळत्या ग्रीवेतून गर्भाशयाचे तोंड योनिमार्गात उघडते.
मासिक पाळीच्या चक्रात गर्भाशयाच्या अंतःत्वचेमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या प्रभावाखाली दरमहा बदल होतात. ते फलित बीजांडाच्या रोपणास व पोषणास योग्य असे असतात. फलित बीजांडाचे (गर्भाचे) रोपण झाल्यावर (गर्भधारणा) त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती ही गर्भाशयाची महत्त्वाची कामे आहेत.
बीजांडाचे फलन न झाल्यास ते, अंतःत्वचेचा वरील थर व थोडे रक्त मासिक पाळीच्या रक्तस्रावाच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जातात व मासिक पाळीचे नवीन चक्र सुरू होते.
गर्भाशय आणि बाह्य जननेंद्रीये यामधील स्थितीस्थापक तंतुस्नायुमय नलिकेस योनी म्हणतात. तिचे गर्भाशयाकडील तोंड गर्भाशयग्रीवेला सर्व बाजूनी चिकटलेले असते व गर्भाशयमुख तिच्यात उघडते. तिचे दुसरे तोंड बाह्य जननेंद्रीयात मूत्रमार्गाखाली उघडते. स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग आणि योनी मार्ग (संभोगाचा मार्ग) वेगवेगळे असतात.
कामोत्तेजित अवस्थेत बाह्य जननेंद्रीये व योनीत तयार होणारे स्राव संभोगाच्या वेळी योनीत शिश्नाचा प्रवेश सुलभ करवितात. त्यावेळी योनी शिश्नास सामावून घेते व क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते. वीर्यातील शुक्रजन्तू तेथून गर्भाशयमुखामार्गे गर्भाशयात प्रवेश करतात.
तसेच प्रसूतीच्या वेळी गर्भाशयातून बाळ योनीत प्रवेश करते व योनीमुखाद्वारे जन्म घेते.
याप्रमाणे संभोगाचा आणि प्रसूतीचा मार्ग म्हणून योनी काम करते.
पुरुषाप्रमाणेच स्त्रीमध्येही अंतस्त्रावी ग्रंथींतून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या समन्वयाने जननसंस्थेचे नियंत्रण होते. बाल्यावस्थेत जननेंद्रियांची वाढ होत नाही. पण वय वर्षे १०-११ च्या (मुलांपेक्षा एक वर्ष आधी) सुमारास मेंदूमधील अग्र पोषग्रंथीमधून (Pituitary gland) पुटक उद्दीपक संप्रेरक (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन - Follicle-stimulating hormone) व पीतपिंडकारी संप्रेरक (ल्युटिनायझिंग हार्मोन - Luteinizing hormone) स्रवण्यास सुरुवात होते व त्यामुळे पौगंडावस्थेची सुरुवात होते.
पुटक उद्दीपक संप्रेरकाच्या प्रभावामुळे बीजांडंकोशात पुटकनिर्मिती व त्यामध्ये बीजांड निर्मिती सुरू होते. तसेच पुटकातील पेशींतून ईस्ट्रोजेन या अंतःस्रावाचीही निर्मिती सुरू होते. पुटक व बीजांडाची पुरेशी वाढ झाल्यावर पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पुटक फुटते व बीजांड मुक्त होते. त्यानंतर या संप्रेरकाच्या प्रभावामुळे फुटलेल्या पुटकात पीतपिंडाची निर्मिती व वाढ होते. पीतपिंडातून प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवते.
याशिवाय मुख्यतः दुय्यम लैंगिक चिन्हांच्या विकासाला अवटु व अधिवृक्क या अंतःस्रावी ग्रंथीही सहाय्य करतात.
बाह्य स्त्री जननेंद्रिये
ही स्त्रीची संभोगाची इंद्रिये असून संभोगाचे वेळी शिश्नाचा योनीत प्रवेश होण्यास मदत करणे आणि अंतर्गत जननेंद्रीयांचे संसर्गापासून रक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे. स्त्रीमधील बाह्य जननेंद्रीयांमध्ये योनिमुख आणि त्याभोवती असणाऱ्या भगप्रकोष्ठ, बृहत्भगोष्ठ, लघुभगोष्ठ,भगशिश्न आणि प्रघ्राणग्रंथी या अवयवांचा समावेश होतो. भगशिश्न हे पुरुषाच्या शिश्नाशी समजात असून उत्थानक्षम असते. पुरुषाप्रमाणे मूत्रमार्गाशी याचा संबंध येत नाही. स्त्रीचा मूत्रमार्ग स्वतंत्रपणे बाह्य जननेंद्रियात उघडतो. बृहत्भगोष्ठ आणि लघुभगोष्ठ त्वचेच्या घड्यानी बनलेले असते. हे अवयव उत्थानक्षम व अतीसंवेदनक्षम असल्याने या भागास रक्तवाहिन्यांचा आणि चेतातंतूंचा भरपूर पुरवठा असतो.
प्रघ्राण ग्रंथी (बार्थोलिन ग्रंथी - Bartholin's gland): योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस या ग्रंथी असून त्यांच्या नलिका लघुभगोष्ठांच्या आत योनिमुखाच्या दोन्ही बाजूंस उघडतात. पुरुषाच्या कंदमूत्रमार्ग ग्रंथींशी (Bulbourethral glands/Cowper's gland) या समजात असल्या तरी त्यांचे स्थान वेगळे आहे. संभोगाच्या वेळी किंवा उत्तेजित झाल्यानंतर या ग्रंथीमधून पाझरलेला स्राव योनिमार्गामध्ये स्नेहनाचे कार्य करतो.
संदर्भ
- ^ भालेराव, कमल; सलगर, द. "मानवी जनन तंत्र". मराठी विश्वकोश. 4 ऑक्टोबर 2018 रोजी पाहिले.
- ^ परांडेकर, शं. आ. "अर्धसूत्रण विभाजन". मराठी विश्वकोश. 10 ऑक्टोबर 2018 रोजी पाहिले.
- ^ भालेराव, कमल; सलगर, द. "पुरुष जनन तंत्र". मराठी विश्वकोश. 4 ऑक्टोबर 2018 रोजी पाहिले.
- ^ भालेराव, कमल; सलगर, द. "स्त्री जनन तंत्र". मराठी विश्वकोश. 4 ऑक्टोबर 2018 रोजी पाहिले.