Jump to content

मानवी आवाजाचे वैशिष्ट्य सांगणारे मराठी शब्द

करडा आवाज म्हणजे ज्या आवाजात शिस्त लावण्याच्या दृष्टीने किंचित कठोरपणा आहे असा आवाज. आवाजाच्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी मराठीत जे अनेक शब्द आहेत त्यांतला करडा हा एक शब्द आहे. हेच विशेषण वापरून अधिकाऱ्याच्या कारभारासाठी ’करडा अंमल’ अशा शब्दांचा प्रयोगी केला जातो.

मानवी आवाजाचे वैशिष्ट्य सांगणारे काही मराठी शब्द :-

  • अनुनासिक
  • अस्पष्ट
  • कटकटा
  • कठोर
  • करडा
  • करुणार्द्र
  • कर्कश
  • किरकिरा
  • कृत्रिम
  • कोरडा
  • खडा (शाहीर अमर शेख यांच्या आवाजासारखा)
  • खणखणीत
  • खरखरीत
  • खर्जातला
  • खुला
  • गडगडाटी
  • खोल
  • गेंगाणा
  • गोड (चांगल्या दुकानदारांचा गिऱ्हाइकांशी बोलण्याच्या आवाजासारखा)
  • घाबरट
  • घाबरा
  • घाबराघुबरा
  • घुमणारा
  • घोगरा
  • चिरका
  • चोरटा
  • जरबेचा
  • टरका
  • टिपेचा
  • डरावणा
  • ढाला
  • तुपकट
  • दबका
  • दमदार (शोभा गुर्टू यांच्या आवाजासारखा)
  • दुमदुमणारा
  • धीरगंभीर (अमिताभ बच्चनचा आवाज)
  • नाकातला
  • पसरट
  • पुरुषी
  • प्रामाणिक
  • बसका (राणी मुखर्जीचा आवाज)
  • बायकी
  • बारीक
  • बेसूर
  • भिजलेला
  • भित्रा
  • मंजुळ
  • मंद
  • मधाळ
  • मधुर (पक्ष्यांचा आवाज)
  • मायाळू आवाज
  • मेंघळट
  • मोकळा
  • मोठा
  • रडका
  • रागीट
  • रुंद
  • लहान
  • लहान मुलासारखा
  • लडिवाळ ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधल्या घनाच्या आईचा-इला भाटेचा आवाज)
  • लाडिक
  • सुरेल
  • (सु)स्पष्ट
  • हलका (कुजबुजीचा आवाज)
  • क्षीण (आजारी माणसाचा आवाज)