Jump to content

माधव कानिटकर

माधव कानिटकर हे एक मराठी लेखक होते. त्यांची बहुतेक पुस्तके पुण्यातील 'मेनका प्रकाशना'ने प्रसिद्ध केली आहेत.

कानिटकरांनी लिहिलेली पुस्तके

  • अधर्म
  • अनुरागाची वेल
  • अनोळखी
  • अपरिणीता
  • इंद्रधनूचा सेतू
  • चंदनगौर
  • झोका
  • तुळशीचा मळा
  • पाळणा
  • मदनरेखा
  • मयूरपंख
  • रत्नावलि
  • रूप पाहता लोचनी

माधव कानिटकर याच नावाचे आणखी एक लेखक आहेत. हे कानिटकर 'मानिनी' दिवाळी अंकाचे संपादक असतात. ह्यांची पुस्तके 'डायमंड पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केली आहेत.

'या' कानिटकरांनी लिहिलेली पुस्तके

  • गृहिणीगाथा (हिंदू स्त्रियांचे सण आणि व्रते यांविषयी माहिती आणि कहाण्या)
  • जयकांतनच्या कथा (डी.जयकांतन यांच्या इंग्रजी कथांचा अनुवाद)
  • दैनंदिन तुकाराम गाथा : निवड व निरूपण
  • दैनंदिन दासबोध : निवड व निरूपण
  • रसनारंजन (पाककलेवरील पुस्तक)
  • बाल-कुमारांचा ज्ञानकोश - ज्ञानरंजन (भाग १ व २)
  • महाभारत (७०० पानी ग्रंथ)
  • शब्दमाधव (पृष्ठसंख्या - ५३५)
  • दैनंदिन सकळ संतगाथा
  • दैनंदिन ज्ञानेश्वरी

तिसरे माधवराव कानिटकर

माधव गजानन कानिटकर नावाचे एक तरुण ॲडव्होकेट लेखक होते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' लिहिणारे वि ग. कानिटकर हे माधव यांचे मोठे बंधू. या माधव कानिटकरांचे, ते कोर्टाच्या कामानिमित्त खानदेशात गेले असताना, तेथील नेरी या गावी १६ जून १९७६ रोजी निधन झाले. 'माणूस' मासिकात, ते त्यांनी अनुभवलेल्या खुनाच्या कोर्ट केसेससंबंधी लिहीत. त्यांच्या अनेक कथांपैकी चार दीर्घकथांचा संग्रह 'रूपवती भार्या शत्रु:!' या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे.