Jump to content

माधव आपटे

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
माधव आपटे
व्यक्तिगत माहिती
फलंदाजीची पद्धतउजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने मध्यमगती
कारकिर्दी माहिती
{{{column१}}}{{{column२}}}{{{column३}}}{{{column४}}}
सामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}
धावा {{{धावा१}}} -- {{{धावा३}}} {{{धावा४}}}
फलंदाजीची सरासरी ४९.२७ -- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}
शतके/अर्धशतके १/३ -- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}
सर्वोच्च धावसंख्या १६३* -- {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}
चेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}
बळी -- {{{बळी३}}} {{{बळी४}}}
गोलंदाजीची सरासरी -- -- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}
एका डावात ५ बळी -- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}
एका सामन्यात १० बळी {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}
सर्वोत्तम गोलंदाजी -- -- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}
झेल/यष्टीचीत २/० -- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

जुलै ७, इ.स. २००६
दुवा: [१] (इंग्लिश मजकूर)


माधवराव लक्ष्मणराव आपटे (जन्म : मुंबई, इ.स. १९३३; - मुंबई , २३ सप्टेंबर २०१९) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते भारताकडून सात कसोटी सामने खेळले.

माधव आपटे यांची पहिल्या दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत खेळायची सुरुवात मुंबई संघातून झाली. या वेळी त्यांनी रणजी सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर १९५२-५३ या काळात ते सात कसोटी सामने खेळले. त्यांतले दोन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध होते. उरलेल्या पाच सामन्यांत त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एक शतक आणि काही अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या गोलदांजांची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे ते तत्कालीन विक्रमी फलंदाज ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता.

या दौऱ्यानंतर आपटे यांना पुन्हा भारतीय क्रिकेट संघात घेतले नाही. मात्र त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्याचे काम केले. दरम्यान, अन्य प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या. यांत त्यांची सहा शतके आहेत. मुंबई क्रिकेटला गुणवत्तापुरवठा करणाऱ्या कांगा साखळीत माधवराव तब्बल ५० वर्षे खेळले. दि ब. देवधरांपासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळ्यांबरोबर माधवराव खेळले. शेवटचा कांगा साखळी सामना खेळले, त्या वेळी माधव आपटे ७१ वर्षांचे होते.

मधल्या काळात माधव आपटे हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCIचे) अध्यक्ष झाले. ते अध्यक्ष असताना, १४ वर्षीय सचिन तेंडुलकरची गुणवत्ता हेरून त्यांनी नियमांना डावलून त्याला क्लबकडून खेळण्याची संधी दिली.

क्रिकेटबरोबरच स्कॅश आणि बॅडमिंटन या खेळांत आपटे पारंगत होते.

उद्योजक माधवराव आपटे

माधव आपटे यांचे वडिलोपार्जित साखर कारखाने व कापडाच्या गिरण्या होत्या. जम्बो आइस्क्रीम, फलटण शुगर वर्क्‍स, लक्ष्मी विष्णू गिरणी, स्वस्तिक समूह, कॅम्लिन या कंपन्यांचे ते मुख्य संचालक होते.

ते काही काळ मुंबईचे नगरपाल व मुंबई चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष होते.

आत्मचरित्र

माधवराव आपट्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे, त्याचे नाव -

  • As Luck would Have It : Unplugged Uncut' (इंग्रजी)