Jump to content

माधवी गोगटे

माधवी गोगटे
जन्म ७ ऑगस्ट १९६४
मृत्यू २१ नोव्हेंबर, २०२१ (वय ५७)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपटघनचक्कर
धर्महिंदू

माधवी गोगटे (७ ऑगस्ट, १९६४ - २१ नोव्हेंबर, २०२१) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी प्रामुख्याने मराठी नाटक, मराठी व हिंदी चित्रपट तसेच मराठी व हिंदी दूरचित्रवाहिनी मालिकेत काम केले आहे.[]

माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. त्यांनी सर्व प्रथम मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९८७ मध्ये सूत्रधार या हिंदी चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. इस १९९० मध्ये अशोक सराफ सोबत त्यांनी घनचक्कर या मराठी चित्रपटात काम केले. यानंतर ‘सत्त्वपरीक्षा’ या मराठी सिनेमात त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले.[]

गोगटे यांनी प्रामुख्याने 'भ्रमाचा भोपळा','गेला माधव कुणीकडे','अंदाज आपला आपला' या मराठी नाटकात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मराठी नाटके, मराठी-हिंदी चित्रपटात काम करत त्यांनी 'मिसेस तेंडुलकर', 'कोई अपना सा', 'ऐसा कभी सोचा न था', 'एक सफर', 'बसेरा', 'बाबा ऐसो वर ढुंडो', 'ढुंड लेंगी मंजिल हमें', 'कहीं तो होगा' या हिंदी मालिकेत काम करत छोट्या पडद्यावर देखील आपली ओळख निर्माण केली. याशिवाय 'स्वप्नांच्या पलीकडले','तुझं माझं जमतंय' या मराठी मालिकेत देखील त्यांनी काम केले.[]

हिंदी दूरचित्रवाहिनी स्टार प्लसवरील 'अनुपमां' या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. ही त्यांची शेवटची भूमिका ठरली.[]

कोरोनाची लागण झाल्यामुळे २१ नोव्हेंबर २०२१ रोजी गोगटे यांचे मुंबई येथील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.[][]

अभिनय सूची

चित्रपट

  • बाप रे बाप डोक्याला ताप (मराठी चित्रपट, २००८)
  • चलता है यार (हिंदी चित्रपट, २००५)
  • कृष्णा कॉटेज (हिंदी चित्रपट, २००४)
  • हा खेळ नशिबाचा (मराठी चित्रपट, २००१)
  • सत्त्वपरीक्षा (मराठी चित्रपट, १९९८)
  • यशवंत (हिंदी चित्रपट, १९९७)
  • डोक्याला ताप नाही (मराठी चित्रपट, १९९०)
  • घनचक्कर (मराठी चित्रपट, १९९०)
  • सूत्रधार (हिंदी चित्रपट, १९८६)

मालिका

  • तुझं माझं जमतंय (टीव्ही मालिका, २०२०)
  • अनुपमॉं (टीव्ही मालिका, २०२०)
  • काल भैरव रहस्य (टीव्ही मालिका, २०१७)
  • स्वप्नांच्या पलिकडले (टीव्ही मालिका, २०१७)
  • दुहेरी (टीव्ही मालिका, २०१६)
  • सावध इंडिया: क्राइम अलर्ट (टीव्ही मालिका, २०१२)
  • मिसेस तेंडुलकर (टीव्ही मालिका, २०११)
  • बाबा ऐसो वर ढुंढो (टीव्ही मालिका, २०१०)
  • ढुंढ लेंगी मंजिल हमें (टीव्ही मालिका, २०१०)
  • एक सफर ऐसा कभी सोचाना था (टीव्ही मालिका, २००९)
  • वो रहने वाली मेहलों की (टीव्ही मालिका, २००५)
  • कहीं तो होगा (टीव्ही मालिका, २००३)
  • कोई अपना सा (टीव्ही मालिका, २००१)
  • बसेरा (टीव्ही मालिका, २०००)

नाटके []

  • भ्रमाचा भोपळा (मराठी नाटक)
  • गेला माधव कुणीकडे (मराठी नाटक)
  • अंदाज आपला आपला (मराठी नाटक)
  • प्रियतमा (मराठी नाटक)
  • बे दुणे पाच (मराठी नाटक)
  • लेकुरे उदंड जाली (मराठी नाटक)

संदर्भ

  1. ^ a b c d "madhavi gogate death: अभिनेत्री माधवी गोगटे यांचं करोनामुळे निधन, 'अनुपमा' मालिकेमुळे मिळाली लोकप्रियता". महाराष्ट्र टाइम्स. रोजी मूळ पानापासून संग्रहित2021-11-22.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ a b "टीवी एक्ट्रेस माधवी गोगटे का हुआ निधन, टीवी सीरियल 'अनुपमा' में मां के रोल से मिली थी खास पहचान". TV9 Bharatvarsh. ११ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील माधवी गोगटे चे पान (इंग्लिश मजकूर)