मादागास्कर प्रवाह
पूर्व मादागास्कर प्रवाह याच्याशी गल्लत करू नका.
मादागास्कर प्रवाह मादागास्करच्या पश्चिम किनाऱ्यालगत दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा समुद्री प्रवाह आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांतील हा एकमेव उत्तरेकडे वाहणारा प्रवाह आहे व अनेकदा खलाशी याचा उपयोग आफ्रिकेकडून भारताकडे येण्यास करतात.
हा प्रवाह याच्या उलट दिशेने वाहणाऱ्या अगुल्हास प्रवाहापेक्षा क्षीण व कमी पसरट आहे.