माथियू केरेकू
माथियू केरेकू | |
बेनिनचा राष्ट्राध्यक्ष | |
कार्यकाळ ४ एप्रिल १९९६ – ६ एप्रिल २००६ | |
मागील | निसेफोर सोग्लो |
---|---|
पुढील | यायी बोनी |
कार्यकाळ २६ ऑक्टोबर १९७२ – ४ एप्रिल १९९१ | |
मागील | जस्टिन अहोमदेग्बे-तोमेतिन |
पुढील | निसेफोर सोग्लो |
जन्म | २ सप्टेंबर, १९३३ कूआर्फा, फ्रेंच दहोमी (आजचा बेनिन) |
धर्म | ख्रिश्चन |
माथियू केरेकू (फ्रेंच: Mathieu Kérékou; २ सप्टेंबर १९३३) हा पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. केरेकू १९७२ ते १९९१ व १९९६ ते २००६ ह्या दोन वेळेंना राष्ट्रप्रमुख होता. केरेकूच्या नेतृत्वाखाली १९७५ ते १९९० दरम्यान बेनिन देश मार्क्सवादी--लेनिनी बेनिनचे जनतेचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. १९९० सालच्या क्रांतीनंतर १९९१ साली केरेकुला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले परंतु १९९६ सालची निवडणुक जिंकुन तो पुन्हा राष्ट्राध्यक्षपदावर आला.