माणकोजी दहातोंडे
माणकोजी दहातोंडे हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. माणकोजी दहातोंडे सुर्यवंशीय क्षत्रिय मराठा ह्या कुळातील होते. त्यांचे मुळगाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा आहे.त्यांनी सूरवातीच्या काळात शहाजीराजेंबरोबर निजामशाहीत काम केले. मुगलांविरूद्धच्या अनेक लढाईत माणकोजींनी मोठा पराक्रम गाजवला. शहाजहान व आदिलशहा यांच्यामध्ये झालेल्या तहानंतर माणकोजी व शहाजीराजे विजापुरच्या सेवेत दाखल झाले होते. विजापुरातच शहाजीराजेंनी माणकोजींना स्वराज्याचा संकल्प सांगितला. स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून शहाजीराजेंनी माणकोजींची नियुक्ती केली. शिवाजीराजेंच्या मदतीसाठी माणकोजी पुण्यात दाखल. माणकोजी दहातोंडे म्हणजे शहाजीराजेंचा खास जुना व इमानदार माणुस. माणकोजी हे शिवाजी महारांजाचे फक्त सरसेनापतीच नाही तर मार्गदर्शक व गुरूपण होते. माणकोजींच्या अनुभवामुळे व युद्धनितीमुळे स्वराज्याच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. माणकोजी हे गनिमी कावातज्ञ म्हणून ओळखले जात. स्वराज्याच्या विस्तारात माणकोजींचे खुप मोठे योगदान. लोहगङ व विसापुरचे किल्ले माणकोजींनी स्वतः जिंकले. पुरंदरचा किल्ला महाराजांनी पहिल्यांदाजिंकला तेव्हा माणकोजी महारांजासोबत होते. १६५६ मध्ये जावळी जिंकली तेव्हा माणकोजी व रघुनाथ बळ्ळाल यांनी रणतोंङीच्या घाटात नाकेबंदी केली होती. १६५७ हे माणकोजींच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष. १४ मे १६५७ला युवराज संभाजीराजेंचा जन्म. घरात नातवासमान युवराज जन्माला आल्यामुळे माणकोजींना आनंद. बढती – मार्च१६५९मध्ये माणकोजींना स्वराज्याचे प्रमुख सल्लागार व युद्धशास्र तज्ञ (Senior Adviser & Warfare Minister) म्हणून नियुक्त करण्यात आले. जिजाबाई व शिवाजीराजेंनीदरबारात खुप मोठा सत्कार केला. राजेंच्या सदरेवर माणकोजींना भारी वजन होते. सईबाईंचे निधन झाले तेव्हा माणकोजींनी जातीने महाराजांचे सांत्वन केले. अफजलखाना विरुद्धच्या लढाईच्या नियोजनामध्ये माणकोजींचा मोठा सहभाग होता. पुन्हा एकदा रणतोंङीचा घाट बंद करण्याचे ठरविले म्हणजे खान व त्याची फौज परत जाता कामा नये. खानाच्या भेटीआधीच्या बैठकीत माणकोजींचे खास मार्गदर्शन. खानाच्या भेटीला जाण्याआधी महाराजांनी माणकोजींचे दर्शन घेतले.
खानाला मारून आल्यानंतर दारातच उभ्या असलेल्या माणकोजींना राजांनी मिठी मारली. खानाच्या वधानंतर शहाजीराजे व माणकोजींची पुण्यात भेट. शहाजीराजेंच्या स्वागताला माणकोजी हजर. खुप दिवसांनी भेट झाल्यामुळे दोघांनाही आनंद. शहाजीराजे , शिवाजीराजे, माणकोजी व जिजाबाई मध्ये स्वराज्याची खाजगीत चर्चा. माणकोजींची तब्येत ढासळते. जिजाबाई स्वतः भेटुन येतात व महाराजांना खबर देतात. महाराज स्वतः शिवापुरला माणकोजींना भेटायला जातात. शेवटच्या घटका मोजत असतांनाही माणकोजींना स्वराज्याचीच काळजी. एवढी प्रकृती खालावली असुनही स्वराज्याची चिंता बघुन महाराज गहिवरतात. महाराजांना शायिस्तेखानाचा बंदोबस्त करायला सांगतात. माणकोजी मॉंसाहेबांना मुजरा सांगतात. महाराज व माणकोजींची हिच शेवटची भेट. जुलै ते अॉगष्ट दरम्यान १६६२ मध्ये शिवापुर येथे माणकोजींचे निधन. माणकोजींच्या निधनाची बातमी राजांना कळते. लहानपणापासून बघितलेला एक जिव्हाळ्याचा माणूस गेल्याची राजांना खंत. महाराजांनी मोठ्या मानाने माणकोजींचा अंत्यविधि केला. माणकोजी हे दिलदार व मनमिळाऊ स्वभावाचे होते. शहाजीराजे व शिवाजीराजे या दोघांसाठी काम करणारे एकमेव सरसेनापती. सलग ३५ वर्षे स्वराज्याची सेवा. शहाजीराजेंसाठी १५ वर्षे तर शिवाजीराजेंसाठी २० वर्षे सेवा. १६४२-१६५९ अशी सलग सतरा वर्षे सरसेनापती म्हणून सेवा कराणारे एकमेव सरसेनापती. बाकीचे वर्षे प्रमुख सल्लागार (Senior Adviser) व युद्धशास्त्र तज्ञ (Warfare Minister) म्हणून काम. दोन्ही राजांची मर्जी असल्यामुळे संपत्तीचा मोह व चिंता कधीही नाही. माणकोजींना शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वराज्याचाच ध्यास होता.
- ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले