माझी चित्तरकथा
माझी चित्तरकथा हे डॉ. अनिल अवचट यांनी लिहिलेले पुस्तक आहे. अवचट हे चित्रकारही आहेत. या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या चित्रकला प्रवासाविषयी नोंदविले आहे.
पुस्तकाचा आशय
अवचट यांनी लहानपणी मोर, हत्ती, दगड, डोंगर, झाडं, माणसं यांची भरपूर चित्रं काढली. स्केचपेन, बाॅल पाॅइंट पेन, मार्कर्स, ‘एच’, ‘बी’चे सुईसारखे शिसं असलेल्या क्लच पेन्सिल्स… ऑइल पेस्टल, साॅफ्ट ड्राय पेस्टल अशी अनेक माध्यमं वापरून सातत्याने प्रयोग करत त्यांनी चित्रांचा अभ्यास केला आहे असे ते नोंदवतात. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील मोर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सहजसोप्या -साध्या रेषेतून उमटलेली भरपूर चित्रं या पुस्तकात आहेत. एकमेकांशी गप्पा मारणारी एकमेकांना बिलगून बसलेली मायाळू माणसे, आदिमानवाच्या गुहेतील चित्रांची आठवण होईल अशी नाजूक रेषांतील माणसं , पाना - फुलांसारखीच एकमेकांत गुंतून गेलेली युगुलांची चित्र … जाड मार्करच्या रेषांनी वेगवेगळे भाव दाखवणारे भावपूर्ण चेहरे, शिल्प आहेत असा भास होणारे एकमेकांना जोडलेले बारिक टोकाच्या पेनने शेडिंग केलेले चेहरे. डोंगरातून फिरणारे हत्ती, पानांच्या पसा-याचा पिसारा झालेले मोर… आणि खूप खूप झा…. आभाळ व्यापून टाकलेली, घनदाट जंगलातील, गार गार सावली देणारी अशी झाडे, धुक्यात हरवलेली काहीशी गूढ वाटणारी क्लच पेन्सिलने शेडिंग केलेली झाडे , डोंगर. .. म्हातारबाबा … ऑइल पेस्टलमधे केलेली काहीशी अमूर्त वाटणारी मात्र मनाला नवी उमेद देणारी चित्रे अशी विविध प्रकारची अनेक चित्रं या पुस्तकात आहेत.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Anil Awachat (अनिल अवचट)". Anil Awachat (अनिल अवचट) (इंग्रजी भाषेत). 2018-07-14 रोजी पाहिले.