Jump to content

माकुणसार

  ?माकुणसार

महाराष्ट्र • भारत
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ१.०८३ चौ. किमी
जवळचे शहरपालघर
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२,५०० (२०११)
• २,३०८/किमी
भाषामराठी
सरपंच/उपसरपंचजयंत पाटील /अमोल मोहिते
कोड
पिन कोड
दूरध्वनी
• आरटीओ कोड

• ४०११०२
• +०२५२५
• एमएच४८
बोलीभाषा:वाडवळी

माकुणसार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर रामबाग प्राथमिक शाळा सोडल्यानंतर लगेचच हे गाव लागते. सफाळेपासून हे गाव ६.५ किमी अंतरावर आहे.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.उन्हाळ्यात येथे भाजीपाला व फळभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. येथे दुग्ध व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून केला जातो.सफाळे रेल्वे स्थानकातून भल्या पहाटे येथील दुधवाले मुंबईत दूध घेऊन जात असत.त्या गाडीला दूधवाल्यांची गाडी म्हणून ओळखले जाई. अलीकडे खाणावळ तसेच अन्य दुग्ध उत्पादने उदा.श्रीखंड, पनीर, ताक,चक्का, मावा, लस्सी,दही,पेढे,बासुंदी तयार करून विकली जातात. खाण्यापिण्याचे कंत्राटदार म्हणून येथील नवीन पिढी व्यवसायात उतरली आहे.

पक्षीवैभव

माकुणसार ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथमच आपल्या गावातील पक्षीगणना केली आहे.परिसरात ३६ स्थलांतरित प्रजातीसह एकूण ९१ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. माकुणसार खाडी, मालजुई बंधारा, अनेक पाणथळ जागा येथे विविध देशीविदेशी प्रजातींचे पक्षी आढळले.मुख्यतः खालील पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या. अमुर ससाणा, गप्पीदास,तुतारी, करढोक म्हणजेच पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत स्टॉर्क, चमच्या, ग्रे हेरॉन, एरगेटस् हे स्थलांतरित पक्षी तर पाणकावळे, घार, टिटवी, होले, खंड्या, वेडाराघू, सुभग, कोतवाल, बुलबुल, चीरक, शिंजीर, हरोळी हे स्थानिक पक्षी आढळून आले.[] शेकाट्या/शेकोट्या/शेकाटया स्थलांतरित पक्षी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात माकुणसार, केळवे, माहीम, खारेकुरण येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.[]

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६२६ कुटुंबे राहतात. एकूण २५०० लोकसंख्येपैकी १२४९ पुरुष तर १२५१ महिला आहेत. गावाची साक्षरता ९०.९५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९४.३३ आहे तर स्त्री साक्षरता ८७.५२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २२३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या ८.९२ टक्के आहे. मुख्यतः वाडवळ,भंडारी,आगरी समाजातील लोक येथे राहतात.ते छोट्या प्रमाणावर शेती व दुग्ध व्यवसाय करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा केले जाते.हल्ली मोठ्या प्रमाणावर येथील लोक नोकरी, व्यवसाय, धंदा,कंत्राटी कामानिमित्त मुंबई तसेच सुरत वगैरे ठिकाणी रोज ये-जा करतात.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा सफाळेवरून दिवसभर उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

भादवे, चहाडे, वासरे, खडकोळी, तांदुळवाडी, रामबाग, विळंगी, खटाळी, दांडा, उसरणी, दहिसर तर्फे माहीम, टिघरे ही जवळपासची गावे आहेत.

संदर्भ

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdchttps://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html ४. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ ५. http://tourism.gov.in/ ६. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 ७. https://palghar.gov.in/ ८. https://palghar.gov.in/tourism/

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी गुरुवार २३ फेब्रुवारी २०२३
  2. ^ #महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३