माउंड दाबकलम
माउंड दाबकलम (MOUND LAYERING) ही कलमपद्धत आपल्याकडे प्रचलित नाही. यात झाड जमिनीच्या वर थोड्या ऊंचीवर कापून काढतात. हे कलम झाड सुप्तावस्थेत असताना करतात. त्या कापलेल्या भागावर फुटलेल्या धुमराच्या तळाशी मातीचा किंवा माध्यमाचा छोटासा ढीग करतात. त्यातून निघनाऱ्या धुमाऱ्याना मुळया फुटतात. फुटलेल्या धुमाऱ्यावर माती असल्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी इटीओलेशन होऊन मुळया फुटण्यास मदत होते. युरोपात- सफरचंदाचे खुंट यांच्याकरता या कलमपद्धतीचा वापर करतात. मुळया फुटलेले धुमारे काढल्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा नवीन धुमारे फुटतात. त्यावेळी पुन्हा त्यांच्या तळाशी मातीचा ढीगारा केला की त्यांना मुळया फुटतात.