माउंट ब्रॉस
माउंट ब्रॉस | |
---|---|
माउंट लिंकनच्या शिखरावरून दिसणारे माउंट ब्रॉस | |
१४,१७८ फूट (४,३२१ मीटर) | |
कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स मध्ये २२वा | |
पार्क काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
मॉस्किटो पर्वतरांग | |
39°20′8″N 106°6′28″E / 39.33556°N 106.10778°E | |
माउंट ब्रॉस ट्रेल, डिकॅलिब्रॉन | |
कॉलोराडो ९ ते काउंटी मार्ग ८ |
माउंट ब्रॉस अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी मध्ये कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे.
या शिखराला विल्यम ब्रॉस या स्थानिक व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे.[१] ९ मार्च, १८६९ रोजी डॅनियल प्लमर आणि जोसेफ मायर्स या अल्मा गावातील व्यक्तींनी माउंट ब्रॉसवरील पहिल्या चांदीच्या खाणीचा दावा नोंदवला.
मार्ग
अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून माउंट ब्रॉस ट्रेल या पायवाटेने शिखरापर्यंत जाता येते. ही वाट डोंगरावरील मुख्य घळीच्या बाजुने चढत जाते व साधारण तीन चतुर्थांश वाटेवर डावीकडे वळत घळीची दुसरी बाजू चढून जाते. तेथून एक फाटा खाजगी खाणींच्या मधून माउंट लिंकन व कॅमेरोनकडे जातो तर दुसरा फाटा खाजगी जमीनीवरून शिखरापाशी जातो. हे शिखर साधारण सपाट आहे.
या डोंगराचे शिखर व आसपासचा भाग अद्पाय खाजगी मालकीचा आहे. २००५मध्ये या मालकांनी इतरांना माउंट ब्रॉसवर जाण्यास मनाई केली.[२][३][४] १ ऑगस्ट, २००६ रोजी अल्मा गावाने खाजगी मालकांकडून माउंट ब्रॉसवरील बरीचशी जमीन नाममात्र आकार देउन जमीन मालकांकडून भाडेपट्ट्याने घेतली व शिखराकडे जाणारा मार्ग पुन्हा एकदा मोकळा करून दिला. आजही शिखर व आसपासच्या भागाच्या मालकाने अधिकृतपणे खुला केलेला नाही.[५] }}
हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट लिंकन आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात.
- ^ Name History of Mount Bross - 14ers http://www.14ers.com/php14ers/historyview.php?parmpeak=Mt.%20Bross&parmcat=Name%20History
- ^ "Access Update -- Summer 2010". Colorado Fourteeners Initiative. रोजी मूळ पानापासून संग्रहितJuly 9, 2010. 2013-09-03 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
- ^ Tillie Fong (2011-07-19). "Trails on Fourteeners may be opened". Rocky Mountain News. 2008-06-28 रोजी पाहिले.
- ^ Jim Hughes (2006-01-24). "Bill protecting fourteeners' landowners climbs in House". The Denver Post. 2011-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Alma officials mount trail-access campaign". Denver Post. August 8, 2006.