माउंट डेमोक्रॅट
माउंट डेमोक्रॅट | |
---|---|
माउंट ब्रॉसच्या शिखरावरून दिसणारे माउंट डेमोक्रॅट | |
१४,१५५ फूट (४,३१४ मीटर) | |
पार्क काउंटी, कॉलोराडो, लेक काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
मॉस्किटो पर्वतरांग | |
39°20′23″N 106°8′24″E / 39.33972°N 106.14000°E | |
काइट लेक ट्रेल, डिकॅलिब्रॉन |
माउंट डेमोक्रॅट अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी आणि लेक काउंटीच्या सीमेवर कॉन्टिनेन्टल डिव्हाइडवर आहे. अल्मा गावापासून जवळ असलेले हे शिखर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे.
मार्ग
अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून काइट लेक ट्रेलने माउंट डेमोक्रॅट वर चढता येते. पहिल्या टप्प्यात मातीवरील पायवाटेवरून डेमोक्रॅट आणि माउंट कॅमेरॉनमधील खांद्यापर्यंत गेल्यावर डावीकडे वळून खडकांच्या राशींवरून मार्ग काढत डेमोक्रॅटवर जावे लागते. डोंगराच्या वरील भागात सुमारे १०० मीटर तीव्र सरळ चढाई आहे. तेथून शिखराखाली १०० मीटर सपाट रस्ता असून शेवटच्या १०० मीटर उंचीची चढाई कठीण आहे.
हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट ब्रॉस, माउंट लिंकन आणि माउंट कॅमेरॉन हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात.