माउंट कॅमेरॉन
माउंट कॅमेरॉन | |
---|---|
१४,११ फूट (४,३३६ मीटर) | |
पार्क काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
मॉस्किटो पर्वतरांग | |
39°20′N 106°6′E / 39.333°N 106.100°E | |
काइट लेक ट्रेल, डिकॅलिब्रॉन | |
कॉलोराडो ९ ते काउंटी मार्ग ८ |
माउंट कॅलिब्रॉन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर १४,२२३ फूट उंचीचे असून कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे. याच्या सपाट माथ्यामुळे तसेच जवळ असलेल्या इतर तीन १४,००० फूट उंचीच्या डोंगरांमुळे क्वचित याला फॉर्टीनर्सच्या यादीत घातले जात नाही.
मार्ग
अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून माउंट ब्रॉस ट्रेल या किंवा काइट लेक ट्रेल यांपैकी कोणत्याही पायवाटेने शिखरापर्यंत जाता येते. काइट लेक ट्रेल माउंट डेमोक्रॅटच्या बाजूने चढते[१] तर माउंट ब्रॉस ट्रेल माउंट ब्रॉस शिखराखालून जाते.
हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट लिंकन आणि माउंट ब्रॉस हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात.
संदर्भ आणि नोंदी
- ^ ऑलट्रेल्स.कॉम https://www.alltrails.com/trail/us/colorado/mount-cameron. २०२०-०९-०६ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)