माइनाउ
माइनाउ हे बोडेन्जी (कॉन्स्टांत्स तळ्यातील) कॉन्स्टांत्स या गावाजवळील बेट आहे. हे बेट फुलांसाठी प्रसिद्ध आहे. येथील उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे उद्यान बारमाही खुले असते. ऋतुनुसार येथील फुले बदलली जातात, खास करून वसंतात या उद्यानात जाणे म्हणजे नेत्रसुखद अनुभव असतो. या उद्यानाची तुलना ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप उद्यानाशीच होउ शकेल.
बेटावर एक छोटा राजवाडा आहे. त्या राजवाड्यात आतमध्ये देखील ऑर्चिडची बाग फुलवली आहे. येथे अतिशय दुर्मिळ प्रकारच्या ऑर्चिड, वनस्पती तसेच युरोपामध्ये अतिशय दुर्मिळ असणारा पाम वृक्ष येथे जतन केला आहे.