Jump to content

मांडवखेल

मांडवखेल हे महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या बीड तालुक्यातील गाव आहे.बीड तालुक्याच्या खास दोन ओळखी १) दुष्काळी तालुका २) ऊसतोड कामगारांचा तालुका.मांडवखेल हे असेच एक दुर्लक्षित व मागास गाव. आपल्या प्रयत्नांनी या छोट्या गावाने दुष्काळावर मात करण्याचा सामूहिक प्रयत्न केला.

जलयुक्त मांडवखेल

पार्श्वभूमी

ग्रामसभा मांडवखेल

बीड पासून ३७ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे एकूण क्षेत्र  ५२७.५३  हेक्टर आहे. या गावात १३९  घरे आहेत [] २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ४८८ आहे. त्यातील २६८ पुरुष आणि २२०  महिला आहेत.[]

दुष्काळी परिस्थिती

२०१४,२०१५ व २०१८ हे वर्षे बीड जिल्ह्यात दुष्काळ होता.[] [] [] शेतातील नापिकी,शेतकरी आत्महत्या[], गुरांच्या दुष्काळी धावण्या व गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँँकर अशी विदारक परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच गावांची होती.[] [] [] मांडवखेल कमी पर्जन्यमान असल्याने हे गाव नेहमीच दुष्काळी भागात मोडते.[१०] कोरडवाहू शेतीवर उपजीविका होत नसल्याने गावातील लोक ऊसतोडणीसाठी जातात.[११] [१२] [१३] [१४]


दुष्काळाशी दोन हात

मातीनाला बांध मांडवखेल

गावातील लोकानी व ग्रामपंचायतीने गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणलोटक्षेत्र विकासाचा प्रकल्प केला. पानी फाउंडेशनतर्फे होणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेत [१५] गाव सहभागी झाले होते.[१६]

सलग समपातळीतील चर मांडवखेल

पानी फाउंडेशनतर्फे तांत्रिक प्रशिक्षण झाल्यावर गावाची शिवार फेरी करून कामाचे नियोजन झाले.[१७]ग्रामसभेत आगकाडी मुक्त शिवार, चराई बंदी, कुऱ्हाडबंदी असे निर्णय सामूहिकरित्या घेऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. ८ एप्रिल २०१९ पासून गावाने काम करण्यास सुरुवात केली. पुढील ५० दिवसात ५५६३ घनमीटर श्रमदान व ६५००० घनमीटर मशिनच्या माध्यमातून काम करून मोठा जलसाठा निर्माण करण्यात आला.प्रत्येक घरात शोषखड्डा, गावातील शिवारातील माती परीक्षण, गावाच्या प्रति माणसी ६ घनमीटर श्रमदान झाले. माथा ते पायथा पद्धतीने  गावाच्या पाणलोट क्षेत्रावर उपचार करण्यात आले.

अनगड दगडी बांध मांडवखेल
शेततळे मांडवखेल

क्षेत्र उपचार म्हणून बांध बंदिस्ती, सलग समपातळीतील चर, खोल सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध   तर पायथ्याचे उपचार म्हणून नदी खोलीकरण,शेततळी व मातीनाला बांध करण्यात आले.स्पर्धेतील गुणदानाच्या निकषानुसार काम झाले. गावात मोठा पाणी साठा तयार करण्यात आला.  गावाला यावर्षी स्पर्धेत यश मिळाले नाही परंतु गाव पाणीदार झाले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न या कामाने सुटला.


सामाजिक संस्थांची मदत

या सर्व कामात गावाने श्रमदान केले व ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईने अवजड यंत्रांच्या द्वारे काम करण्यासाठी मदत केली.[१८] [१९] [२०] [२१] [२२] [२३]

बक्षीस

सत्यमेव जयते वॉटर कप २०१९ स्पर्धेत गावाची निवड राज्यपातळीवरील १५ गावात झाली.[२४] तालुका पातळीवरील पहिले बक्षीस गावाला मिळाले.[२५]



संदर्भ

  1. ^ https://villageinfo.in/
  2. ^ https://www.census2011.co.in/
  3. ^ "संग्रहित प्रत". 2020-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-13 रोजी पाहिले.
  4. ^ https://agrostar.in/amp/hi/maharashtra/article/agrostar-information-article-5bf00e3a2e7b8c499bc2a938[permanent dead link]
  5. ^ https://www.loksatta.com/vishesh-news/drought-in-india-1250439/
  6. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/beed/farmers-sucide/articleshow/48929188.cms
  7. ^ https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-beed-maharashtra-19936
  8. ^ https://www.youtube.com/watch?v=eBaQwoPyzsE
  9. ^ https://cdn.s3waas.gov.in/s353c3bce66e43be4f209556518c2fcb54/uploads/2018/12/2018120310.pdf
  10. ^ http://bepls.com/spl_2017(3)/7.pdf
  11. ^ https://www.deccanherald.com/content/501207/beed-district-witnesses-large-scale.html
  12. ^ https://www.dhan.org/developmentmatters/2014/march/case1.php
  13. ^ https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
  14. ^ https://sg.inflibnet.ac.in/bitstream/10603/184688/10/10_chapter%203.pdf
  15. ^ "संग्रहित प्रत". 2020-09-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-13 रोजी पाहिले.
  16. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-talukas/
  17. ^ https://www.paanifoundation.in/samruddh-gaon/training-programme/
  18. ^ https://www.youtube.com/watch?v=ffVcUitxSjg
  19. ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-dnyan-prabodhini-works-to-drought-.html
  20. ^ https://www.evivek.com//Encyc/2019/6/3/-drought-IN-Marathwada0898989.html
  21. ^ https://thelogicalindian.com/story-feed/get-inspired/satyamev-jayate-water-cup/?infinitescroll=1
  22. ^ https://www.pudhari.news/news/Marathwada/Water-Cup-Tournament-start-today/m/[permanent dead link]
  23. ^ https://www.loksatta.com/lekha-news/paani-foundation-water-cup-2018-1670228/
  24. ^ https://www.youtube.com/watch?v=YG4Nm8V4Snc
  25. ^ https://www.paanifoundation.in/watercup/list-of-2019-smj-water-cup-winners/[permanent dead link]