महेश केळुसकर
महेश केळुसकर | |
---|---|
जन्म | जून ११, इ.स. १९५९ फोंडाघाट, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
डाॅ. महेश वासुदेव केळुसकर (जून ११, इ.स. १९५९; फोंडाघाट, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आणि लेखक आहेत. 'नागरिक' या मुलाखतविषयक लघुचित्रपटाचे ते संवाद लेखक आहेत. केळुसकर ठाण्यात राहतात.[१]
जीवन
डाॅ. केळुसकर एम.ए. पीएच.डी. असून ते इ.स. १९८३ सालापासून ते आकाशवाणीत नोकरी करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची तीन वर्षासाठीच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यात केळुसकरांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.[ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य
कादंबरी
- क्रमश:
- यू कॅन आल्सो विन[ संदर्भ हवा ]
कवितासंग्रह
- कवडसे
- कवितांच्या गावा जावे[२] (इ,स. २००१)
- झिनझिनाट (इ.स. १९९७)
- निद्रानाश (डिसेंबर २०१७)
- पहारा (इ.स. १९९६)
- मस्करिका
- मी आणि माझा बेंडबाजा (चारोळी विडंबन)
- मोर (इ.स. १९८६)
- रोझ डे (पॉकेटबुक)[ संदर्भ हवा ]
अन्य
- कलमबंदी (साहि्त्य आणि समीक्षा)
- चित्रकथी (पिंगुळी परंपरेतील लोककला)
- जोर की लगी है यार (कथासंग्रह)
- भुताचा आंबा आणि इतर गोष्टी (बालसाहित्य)
- मधु मंगेश कर्णिक : सृष्टी आणि दृष्टी (चरित्र, व्यक्तिचित्रण, समीक्षा)
- व्हय म्हाराजा (ललित)
- साष्-टांग नमस्कार (विनोदी)[ संदर्भ हवा ]
पुरस्कार आणि सन्मान
- २०१८ सालचा आरती प्रभू पुरस्कार
- 'मालवणी' प्रयोगात्म लोककला या त्यांच्या पी.एच.डी. संशोधनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचा कै. अ. का. प्रियोळकर पुरस्कार
- भाऊसाहेब वर्तक पुरस्कार
- 'झिनझिनाट' या त्यांच्या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पुरस्कार (१९९८)
- 'साष-टांग नमस्कार' या विनोदी लेखनासाठी उत्कृष्ट वाड्म़य राज्य पुरस्कार, तसेच पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार[ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ "मराठी भाषा आणि साहित्याला पाठदुखीचा अतोनात त्रास -महेश केळुसकर". Loksatta. २३ मे 2020 रोजी पाहिले.
- ^ 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींच्या कवितांचा, डिंपल प्रकाशन प्रसिद्ध केलेला एकत्रित काव्यसंग्रह आहे.