महेश काणे
महेश काणे हे एक मराठी कीर्तनकार आहेत. हे चिपळूणला राहत असून नरेंद्रबुवा हाटे हे त्यांचे कीर्तनगुरू होत.
महेश काणे हे संगीत विशारद असून कीर्तन प्रशिक्षकही आहेत. इ.स. १९९७ पासून ते कीर्तनक्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या पाच राज्यांत ते कीर्तने करीत असतात. काणेबुवा लेखनही करतात.
पुरस्कार
- इंदूरला मिळालेला कीर्तन केसरी
- उज्जैनला मिळालेला कीर्तन विशारद
- पुणे येथील श्री हरीकीर्तनोत्तेजक सभा नारद मंदिर या संस्थेतर्फे दत्तात्रेय राईलकर, रामचंद्रबुवा भिडे व मेहेंदळेबुवा या ज्येष्ठ कीर्तनकारांच्या मंडळाने काणे यांना कीर्तनभास्कर ही उपाधी समारंभपूर्वक प्रदान केली. (जानेवारी २०१४)