Jump to content

महेंद्र चौधरी

महेन्द्र चौधरी (फेब्रुवारी ९, १९४२- हयात) हे फिजीचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म फिजी मधील विती लेवू बेटाच्या उत्तर-पश्चिमेस असलेल्या बा या शहरात झाला. ते १९९९ च्या फिजी संसदीय निवडणुकांमध्ये बा मधून फिजीच्या संसदेवर निवडून गेले आणि मे १९, १९९९ रोजी फिजीचे पंतप्रधान झाले. मे १९, २००० रोजी ते आणि त्यांचे मंत्रीमंडळ राजधानी सुवा येथील संसदभवनात असताना मूळ फिजी वंशीय जॉर्ज स्पाईट याने संसदभवनावर हल्ला करून त्यांना सगळ्या मंत्रीमंडळासह ओलीस ठेवले. ५६ दिवसांनंतर त्यांची जुलै १३, २००० रोजी सुटका करण्यात आली. दरम्यान मे २७, २००० रोजी महेन्द्र चौधरी ओलीस असताना ते पंतप्रधान म्हणून काम पाहण्यास सक्षम नसल्याने अध्यक्ष रातू कामिसेसे मारा यांनी त्यांना पदच्युत करून तेवीता मोबोडोनू यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.