महेंद्र
राजकुमार महेंद्र | ||
---|---|---|
राजकुमार | ||
अर्हत महेंद्र यांचा बौद्ध विहारातील पुतळा | ||
राजधानी | पाटलीपुत्र | |
पूर्ण नाव | महेंद्र मौर्य | |
जन्म | इ.स.पू. २८५ | |
उज्जैन, मध्यप्रदेश | ||
मृत्यू | इ.स.पू. २०५ | |
अनुराधापुरा, श्रीलंका | ||
पेशा | भिक्खू | |
वडील | सम्राट अशोक | |
आई | महाराणी देवी | |
राजघराणे | मौर्य वंश | |
धर्म | बौद्ध धर्म |
थेरवाद बौद्ध धर्म |
---|
महेंद्र (पाली: महिंद) ( इ.स.पू. ३रे शतक, उज्जैन, मध्य प्रदेश) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्रोतांनुसार ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. महेंद्र हे मौर्य सम्राट अशोक व राणी देवी यांचे थोरले पुत्र आणि संघमित्रा यांचे मोठे भाऊ होते.
ऐतिहासिक स्रोत
दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील दोन धार्मिक ग्रंथांमध्ये महेंद्र श्रीलंकेत गेले होते आणि राजा देवानामपियतिस्सा याचे त्यांनी धर्मांतर केले, याबाबतची माहीती सापडते. हे ग्रंथ म्हणजे महेंद्रचे आयुष्य व त्याचे कार्य याबद्दल माहिती देणारे अगदी मूलभूत स्रोत आहेत. शिलालेखांवरून आणि लिखित स्वरूपातल्या काही संदर्भांवरूनसुद्धा असे स्पष्ट होते की, साधारणपणे इ.स.पू. ३ ऱ्या शतकाच्या आसपासच श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म प्रचलित झाला आणि महेंद्र यांचा कार्यकाळसुद्धा हाच होता.
जीवन
विदिशा नगरीत महेंद्र वाढले, कारण त्यांची आई तिथे राहात होती. त्यांच्या वडिलांचे आध्यात्मिक गुरू मोग्गलीपुत्ता-तिस्सा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार वयाच्या विसाव्या वर्षीच महेंद्र भिक्खू बनले. त्रिपिटकामध्ये ते पारंगत होते. इथ्थिया, उत्तिया, संबला, भद्रशाल आणि सुमन व महेंद्रची आई देवी तिच्या बहिणिच्या मूलिचा मुलगा भंडूक उपासक या इतर भिक्खूंबरोबर महेंद्रांना श्रीलंकेत पाठवले गेले. बौद्धधर्मीय सल्लागार मंडळाची तिसरी सभा पार पडल्यानंतर मोगल्लीपुत्ता-तिस्सा यांच्या शिफारशीनुसार, श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठीच या सगळ्यांना पाठवले गेले होते. महेंद्रबरोबर धर्मगुरूंचा अनुयायी असलेला भानकुका हा त्याच्या मावशीचा नातूही होता. वेदसगिरी विहार येथून या सर्वांनी श्रीलंकेसाठी प्रस्थान केले. हे ठिकाण म्हणजे आताची सांची होय असे मानले जाते.
सुरुवातीचा काळ:
भारतात सम्राट अशोकाचे साम्राज्य असताना, लंकेत सिंहबाहुपुत्र विजयचा वंशधर देवान प्रिय तिस्स नवाचा राजा राज्य करित होता।तीसऱ्या संगिति नंतर स्थविर महेंद्र सोबत चार स्थविर इत्तिय्य,उत्तिय्य,भद्रशाल, सम्बल व श्रामणेर सुमन आणि उपासक भंडूक असे सात जन लंकेस जान्यास निघाले।
राजा तिस्स ने त्यांचे स्वागत केले। आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला।
जनमानसातले महत्त्व व वारसा
हे सुद्धा पहा
- श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्म
संदर्भ
बाह्य दुवे
- Mahinda Thera
- Asoka's Missions from the Extended Mahāvaṁsa
- The arrival of Buddhism in Sri Lanka
- The Birthplace Buddhism in Sri Lanka Archived 2016-01-19 at the Wayback Machine.
- Historical Buddhist details of Sri Lanka
- Buddhism, The Buddha and what are His Teachings? Archived 2007-09-29 at the Wayback Machine.