Jump to content

महिला साहित्य संमेलने

महिलांचा प्रामुख्याने सहभाग असलेली महिला साहित्य संमेलने अनेक संस्था भरवितात. काही उल्लेखनीय संमेलने : -

  • अनुष्का महिला कला साहित्य संमेलन
  • उर्दू-मराठी महिला साहित्य संमेलन
  • कोकण मराठी साहित्य परिषद भरवीत असलेली महिला साहित्य संमेलने
  • (अखिल) गोमंतक महिला साहित्य संमेलन
  • ‘पुढचं पाऊल ट्रस्ट’, ‘भरारी प्रकाशन’ आणि ‘ऋजुता फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने एक राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन १३ नोव्हेंबर २०१६ रोजी दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे झाले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड होत्या. संमेलनादरम्यान साहित्यिका गिरिजा कीर यांचा सन्मान केला गेला..

या संमेलनात साहित्यिका माधवी कुंटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अध्यात्मविषयक अभ्यासक व विचारवंत डॉ. उषा देशमुख, वैद्यकीय क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल डॉ. मंजुषा दराडे, अनाथ मुलांसाठी मौलिक कार्य करणाऱ्या कावेरी नागरगोजे, परिस्थितीशी झगडून यश मिळवणाऱ्या अनघा मोडक, खाकी वर्दीतील संवेदनशील कवयित्री रिटा राठोड- जाधव यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले..

या साहित्य संमेलनादरम्यान ‘ताऱ्यांचे जग- स्त्री साहित्य विशेषांक’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.. ‘गरज स्त्रीचे आत्मभान जागृत करणाऱ्या साहित्याची’ तसेच ‘स्त्रीला आचार, विचार आणि उच्चाराचे स्वातंत्र्य आहे का?’ या विषयांवर या संमेलनात चर्चासत्रे झाली.

कोमसापने भरविलेली महिला साहित्य संमेलने

  • कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले महिला साहित्य संमेलन, २००६मध्ये आवास-अलिबाग येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर. या संमेलनाच्या आयोजनात रेखा रमेश नार्वेकर यांचा मोठा सक्रिय सहभाग होता.
  • २रे महिला साहित्य संमेलन रत्‍नागिरीला २००८ साली झाले. संमेलनाध्यक्षा वीणा गवाणकर.
  • ३रे महिला साहित्य संमेलन २०१०साली. अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे.
  • ४थे महिला साहित्य संमेलन ८-९-१० नोव्हेंबर २०१३ सावंतवाडी येथे. संमेलनाध्यक्षा अचला जोशी []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "महिला साहित्य संमेलनात मेधा पाटकर यांची मुलाखत". लोकसत्ता. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.

पहा

मराठी साहित्य संमेलने