महिला संगीत
महिला संगीत हे स्त्रियांचे, स्त्रियांबद्दलचे आणि स्त्रियांसाठीचे संगीत आहे. [१] स्त्रीवादी चळवळीची दुसरी लाट, कामगार चळवळ , नागरी हक्क आणि शांतता चळवळ ह्यांची संगीत अभिव्यक्ती म्हणून ही शैली जन्माला आली [२] . ही चळवळ सुरू करण्यामागे बर्निस जॉन्सन रीगन व तिच्या "स्वीट हनी इन द रॉक" ह्या गटाचे सदस्य, होली नियर ही शांतता कार्यकर्ती , आफ्रिकन-अमेरिकन संगीतकार लिंडा टिलरी, मेरी वॅटकिन्स, ग्वेन एव्हरी [३] , इत्यादी आणि लेस्बियन सादरकर्त्या क्रिस विल्यमसन, मेग ख्रिश्चन आणि मार्गी अॅडम ह्या यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आघाडीवर होत्या. महिला संगीत म्हणजे महिला संगीतातील एक व्यापक उद्योग आहे. ज्यात संगीतकार, निर्मात्या, ध्वनी अभिनेत्री, तंत्रज्ञ, कव्हर कलाकार, वितरक, प्रवर्तक आणि उत्सव आयोजक महिला आहेत. महिला संगीत हे वरती सांगितलेल्या कलाकारांच्या पलीकडे जाते. [१]
इतिहास
सुरुवातीच्या काळात आलेल्या महिला संगीतात अनेक प्रकार होते. पण त्या सर्वांकडे जीवनाचे प्रतिनिधिक इतकेच म्हणून पाहिले जायचे. रुथ सॉली अनुसार, महिला संगीत हे धर्मामधून आले आहे. जिथे देवतांबद्दलच्या चालीरिती ह्यातून अंतरंगाचे दर्शन घडायचे. तिचे असेही मत होते की, अश्या प्रकारचे संगीत घडवणे हे कलात्मक दृष्ट्या अवघड असते आणि निर्मितीचे सांस्कृतिक मापदंड बनवणे ज्यातून संस्कृतीत बदल घडतील सोपे नसते.
- ^ a b Lont 1992, पान. 242.
- ^ Peraino 2001, पान. 693.
- ^ Hayes 2010.