महासागर
महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.
पर्जन्यमानांना बऱ्याचदा पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात, परंतु आपल्या महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात.
महासागर आणि त्यातील जीवन आपण वातावरणात सोडत असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडच्या चतुर्थांश भाग शोषून घेते.[१]
पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत:
- प्रशांत महासागर (क्षेत्रफळ: १६,६२,४०,९७७ वर्ग किमी)
- अटलांटिक महासागर (क्षेत्रफळ: ८,६५,५७,४०२ वर्ग किमी)
- हिंदी महासागर (क्षेत्रफळ: ७,३४,२६,१६३ वर्ग किमी)
भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.
- दक्षिणी महासागर (क्षेत्रफळ: २,०३,२७,००० वर्ग किमी)
- आर्क्टिक महासागर (क्षेत्रफळ: १,३२,२४,४७९ वर्ग किमी)
- ^ "World ocean day". WWw.gkinformation.info. 2020-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-08 रोजी पाहिले.