Jump to content

महावितरण

महावितरणचा लोगो

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित किंवा महावितरण (इंग्लिश: Maharashtra State Electricity Distribution Company Limited; MSEDCL) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत वितरण करणारी कंपनी आहे. विद्युत कायदा २००३ अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महावितरण, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.

मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यामधील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. सध्या महावितरण १ कोटी ८६ लाख ग्राहकांना वीज पुरविते. यात सुमारे १ कोटी ३१ लाख घरगुती, ३० लाख कृषी, १३ लाख ४६ हजार वाणिज्यिक व २ लाख ५० हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यातून महावितरणला सुमारे ३३ हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो. महावितरणचे ७६,००० कर्मचारी आहेत.

बाह्य दुवे