महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मुंबईच्यावांद्रे टर्मिनस ते दिल्लीमधीलहजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते. पश्चिम रेल्वेमार्गे धावणाऱ्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्सप्रेसला मुंबई ते दिल्ली दरम्यानचे १३६६ किमी अंतर पार करायला १६ तास व ४५ मिनिटे लागतात.