Jump to content

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission (MPSC)
ब्रीदवाक्य

स्वसुख निरभिलाष: खिद्यते

लोकहेतो:
मुख्यालय

मंत्रालय, मुंबई, भारत

बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ३रा माळा, एम.जी.रोड, हुतात्मा चौक, मुंबई - ४०० ००१
सेवांतर्गत प्रदेशमहाराष्ट्र
महत्त्वाच्या व्यक्ती श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर (अध्यक्ष)
मालकमहाराष्ट्र शासन
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (इंग्लिश: MPSC) ही महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात. निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी, मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.

MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो. तसेच विविध सेवांमधील नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इत्यादी बाबींवर सरकारला सल्ला देखील हा आयोग देतो.

राज्यसेवा परीक्षा

केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी नागरी सेवा परीक्षा आणि राज्य सरकारच्या पातळीवरची राज्यसेवा परीक्षा यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.[]

  • MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Agricultural Services Examination - महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
  • MPSC Maharashtra Engineering Services Gr-A Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
  • MPSC Maharashtra Engineering Services Gr-B Examination - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
  • MPSC Civil Judge (Jr Div), Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam - दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
  • MPSC Asstt. Motor Vehicle Inspector Exam - सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
  • MPSC Assist. Engineer (Electrical) Gr-II, Maharashtra Electrical Engg Services, B – सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब
  • MPSC Police Sub-Inspector Examination - पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
  • MPSC Sales Tax Inspector Examination - विक्रीकर निरीक्षक परीक्षा
  • MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा
  • MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा
  • MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा

पात्रता

वयाची १९ वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर आता बंधन घातलेले आहे.खुल्या(अराखीव) प्रवर्गा साठी कमाल ६ संधी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांसाठी कमाल संधीची मर्यादा नाही तर उर्वरित मागास प्रवर्गा साठी कमाल ९ संधींची मर्यादा आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्लिश भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत मराठी हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं.

संदर्भ

[१] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेले जाणारे पद Archived 2019-12-20 at the Wayback Machine.

[२] राज्यसेवा परीक्षा पॅटर्न Archived 2020-07-14 at the Wayback Machine.[] २०२० Archived 2020-07-14 at the Wayback Machine.

[३] कम्बाईन गट 'ब' परीक्षा पॅटर्न Archived 2020-07-11 at the Wayback Machine.[] २०२० Archived 2020-07-11 at the Wayback Machine.

[४] कम्बाईन गट 'क'  परीक्षा पॅटर्न २०२० Archived 2020-07-15 at the Wayback Machine.

बाह्य दुवे

  1. ^ "महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडले जाणारे पद". Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation (इंग्रजी भाषेत). 2019-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-20 रोजी पाहिले.
  2. ^ "MPSC STUDY » MPSC Rajyaseva Exam Pattern 2020". MPSC STUDY (इंग्रजी भाषेत). 2020-07-07. 2020-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-15 रोजी पाहिले.
  3. ^ "MPSC STUDY » MPSC Combine Group 'B' Exam Pattern". MPSC STUDY (इंग्रजी भाषेत). 2020-07-10. 2020-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-15 रोजी पाहिले.