Jump to content

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (इंग्लिश: Maharashtra State Electricity Board; प्रचलित संक्षिप्त नाव: म.रा.वि.म. किंवा एम.एस.ई.बी.) ही महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी कंपनी आहे. एम.एस.ई.बी.ची स्थापना २० जून १९६० रोजी करण्यात आली. तेव्हापासून मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, तिचे पारेषण व वितरण करण्याचे काम एम.एस.ई.बी.कडून केले जात होते. परंतु २००३चा विद्युत कायदा अस्तित्वात आल्यानंतर एम.एसई.बी.ची पुनर्रचना होऊन दि. ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.


बाह्य दुवे