महाराष्ट्र राज्य माहिती आयोग
प्रकार | माहिती प्रसारण |
---|---|
स्थापना | २००५ |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | महाराष्ट्र |
मालक | महाराष्ट्र शासन |
संकेतस्थळ | [१] |
महाराष्ट्र राज्य माहिती आयोग (इंग्लिश: Maharashtra State Information Commission) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. ह्या आयोगाची स्थापना २००५ सालच्या माहितीचा अधिकार अधिनियमाच्या १५व्या कलमाच्या पहिल्या पोटकलमानुसार करण्यात आली. महाराष्ट्रामधील सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सरकारी माहिती सुलभपणे पोचवणे हे माहिती आयोगाचे कर्तव्य आहे.कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून, कोणत्याही व्यक्तीकडून तक्रार प्राप्त करणे आणि त्याची चौकशी करणे, हे केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाचे कर्तव्य असते. संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही विसंगत असले तरी, यथास्थिती, केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग, या कायद्याखालील कोणत्याही तक्रारीच्या चौकशीदरम्यान, कोणत्याही प्रकरणाची तपासणी करू शकतात. ज्या रेकॉर्डवर हा कायदा लागू होतो तो सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आहे आणि अशी कोणतीही नोंद कोणत्याही कारणास्तव त्यापासून रोखली जाऊ शकत नाही.[१]
बाह्य दुवे
- ^ "What We Do: State Information Commission". sic.maharashtra.gov.in. 2022-07-21 रोजी पाहिले.