Jump to content

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Maharashtra State Road Transport Corporation (en); महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (hi); महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (mr) Public transport company of the Indian state Maharashtra (en); शिरपुर परिवहन सेवा (mr); شركة (ar) MSRTC, ST (en); महाराष्ट्र राज्य परिवहन, एस.टी. (mr)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 
शिरपुर परिवहन सेवा
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारव्यवसाय
उद्योगpublic transport bus service
स्थान महाराष्ट्र, भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • इ.स. १९४८
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक
  • इ.स. १९४८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
आकाश मोतीराम कुमरे
ब्रीदवाक्य प्रवाश्यांच्या सेवेसाठी
प्रकार प्रवासी
स्थापना १९४८
संस्थापक मुंबई प्रांत सरकार
मुख्यालय

मुंबई, भारत

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
कार्यालयांची संख्या
सेवांतर्गत प्रदेशमहाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगण
महत्त्वाच्या व्यक्ती


डॉ. श्री. माधव कुसेकर

(उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)
सेवा टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
४३७० कोटी
निव्वळ उत्पन्न ७० कोटी
मालकमहाराष्ट्र शासन
कर्मचारी १ लक्ष ७ हजार
विभाग १२
संकेतस्थळhttps://msrtc.maharashtra.gov.in/index.php

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव : एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.

स्थापना आणि इतिहास

वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली[ संदर्भ हवा ]. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.

सेवा आणि विस्तार

एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे.

वाहनांचा ताफा (फ्लीट)

एस.टी.ची एक ग्रामीण भागात चालणारी बस
एस.टी.ची वातानुकूलित शिवनेरी बस
एस.टी.ची निम-आराम हिरकणी बस

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५१२ वाहने आहेत त्यांचा तपशील पुढीप्रमाणे आहे-

साध्या बसगाड्या१२७००
शहर बस गाड्या१००
निम आराम बसगाड्या४५०
शिवशाही सीटर१०७०
साधी स्लीपर२००
शिवनेरी- अश्वमेध११०
मिडी बस ३०
मानव विकास ८५०
शिवाई

याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत

आधुनिकीकरण

एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.

एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे.

बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच २०१७पासून महामंडळाने 'शिवशाही' या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत.

To measure fuel economy in MSRTC , the term KPTL is used and highest KPTL means high fuel efficiency by vehicle and less operational cost.

       2019-20

DIVISION | AVG. KPTL

Aurangabad | 44.66 Beed | 48.52 Jalna | 48.88 Latur | 46.93 Nanded | 47.95 Osmanabad | 48.06 Parbhani | 46.12 Mumbai | 39.77

महामंडळाची रचना

संचालन

एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [१]

  • श्री.एकनाथ शिंदे- अध्यक्ष
  • श्री डाॅ. माधव कुसेकर(भा.प्र.से.) - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
  • श्री. सुधीर श्रीवास्तव - शासकीय संचालक
  • श्री. यशवंतराव इ. केरुरे - शासकीय संचालक
  • श्रीमती इराने चेरियान - शासकीय संचालक
  • श्री. सतीश पुंडलिक दुधे - शासकीय संचालक
  • डॉ. श्री. प्रवीण गेडाम - शासकीय संचालक

प्रशासकीय कार्यालये

  • मध्यवर्ती कार्यालय :

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.

  • मध्यवर्ती कार्यशाळा :

(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.
(२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.
(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर.

  • विभागीय कार्यालय :

(१) मुंबई
(२) पुणे
(३) नाशिक
(4) औरंगाबाद
(५) अमरावती
(६) नागपूर

  • मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था :

मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.

कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन

एसटी महामंडळात एकूण २२ कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे.

सामाजिक जबाबदारी

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी. तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे.

अधिकृत संकेतस्थळ

संबंधित इतर अधिक माहिती

चित्र दालन