महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
award given by Maharashtra Government | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पुरस्कार | ||
---|---|---|---|
| |||
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असून महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील चित्रपट आणि कलाकारांना दिला जातो. इ.स. १९६१ मध्ये प्रथम पुरस्कार देण्यात आला होता.[१]
विभागणी
हा पुरस्कार साधारणतः १८ विभागात विभागून दिला जातो.[१]
- उत्कृष्ट चित्रपट: प्रथम पुरस्कार-निर्मात्यास वीस हजार रूपयांचे दादासाहेब फाळके पारितोषिक, तर दिग्दर्शकास पाच हजार रूपयांचे रोख.
- द्वितीय पुरस्कार : निर्मात्यास बारा हजार रूपायांचे बाबूराव पेंटर पारितोषिक, तर दिग्दर्शकास तीन हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- तृतीय पुरस्कार : निर्मात्यास आठ हजार रूपयांचे मास्टर विनायक पारितोषिक, तर दिग्दर्शकास तीन हजारांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट कथा : पंधराशे रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट पटकथा : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट संवाद : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट चित्रपट गीते : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट अभिनेता : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट अभिनेत्री : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट संगीतदिग्दर्शक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट छायाचित्रकार (रंगीत व एकरंगी छायाचित्रण) : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट ध्वनिमुद्रण : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट संपादक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट कलादिग्दर्शक (रंगीत व एकरंगी) : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट पुरूष पार्श्वगायक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
- उत्कृष्ट स्त्री पार्श्वगायक : एक हजार रूपयांचे रोख पारितोषिक
संदर्भ
- ^ a b "महाराष्ट्र राज्य (चित्रपट)". मराठी विश्वकोश. 2022-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.