Jump to content

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद ही तत्त्वज्ञानविषयक अभ्यास करणारी भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक संस्था आहे.

स्थापना

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेची स्थापना सभा २ नोव्हेंबर १९८० रोजी कोल्हापूर येथे हिंदकन्या छात्रालयात झाली. प्रा. ज.रा. दाभोळे हे निमंत्रक होते. या सभेत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते असे ३० प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेच्या पूर्वतयारीसाठी व घटनेचा मसुदा तयार करण्यासाठी एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. या समितीची पहिली बैठक २८ डिंसेबर १९८० रोजी स.प. महाविद्यालय, पुणे येथे झाली. तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित हे या सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. या बैठकीत परिषदेचे नाव ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद’ असे ठरविण्यात आले. []

सुकाणू समिती

  1. डॉ. शि.स. अंतरकर - मुंबई
  2. प्रा. श्रीनिवास हरि दीक्षित - कोल्हापूर
  3. डॉ. सु.वा. बखले - नागपूर
  4. प्रा. ज.रा. दाभोळे - कोल्हापूर
  5. डॉ. ज.वा. जोशी - पुणे
  6. डॉ. श्रीनिवास रघुनाथ कावळे - पुणे
  7. प्रा. एस.एन. पाटील - कोल्हापूर
  8. प्रा. मे.पुं. रेगे - मुंबई
  9. डॉ. आर. सुंदरराजन - पुणे

महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचा मसुदा तयार करण्यासाठी एक उपसमिती तयार करण्यात आली. या उपसमितीत डॉ. ज.वा. जोशी, डॉ.ग.ना. जोशी, डॉ. श्रीनिवास रघुनाथ कावळे, प्रा. ज. रा. दाभोळे, व डॉ. शरद देशपांडे यांच्या समावेश होता. सल्लागारपदी प्रा. देविदास दत्तात्रेय वाडेकर व न्यायमूर्ती वि.अ. नाईक हे होते. परिषदेची पहिल्या कार्यकारिणीत पुढील सदस्य होते.

२०१२-२०१६ची कार्यकारिणी

  • डॉ. ज.रा.दाभोळे, कोल्हापूर - अध्यक्ष
  • डॉ. ना.ल. कुंभार, लातूर - कार्याध्यक्ष
  • डॉ. सुरेंद्र गायधने, नागपूर- उपाध्यक्ष
  • प्रा. सुनील गवरे, कल्याण- उपाध्यक्ष
  • डॉ.सुनील साळुंके, लातूर- उपाध्यक्ष
  • प्रा. सुधीर पिटके, फलटण - खजिनदार
  • डॉ .हेमलता मोरे, पुणे - कार्यवाह
  • डॉ. सुनील काळमेघ - कार्यवाह
  • डॉ. संगीता पांडे, मुंबई - कार्यवाह
  • डॉ. मोहन देशमुख, अहमदनगर - सदस्य
  • प्रा. विजय श्रीनाथ कंची, जळगाव - सदस्य
  • प्रा. नामदेव फापाळे, भिवंडी - सदस्य
  • प्रा .प्रभाकर कीर्तनकार, पूर्णा (जिल्हा परभणी) - सदस्य
  • प्रा. अमन बगाडे, अहमदनगर - सदस्य
  • डॉ. ए.पी. सिंग, खामगाव (विदर्भ)- सदस्य

अधिवेशने

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद दरवर्षी एक अधिवेशन आयोजित करते. पहिले अधिवेशन मे १९८४ साली झाले, तर रौप्यमहोत्सवी अधिवेशन २००८ साली झाले. रौप्यमहोत्सवी अधिवेशनाच्या निमित्ताने परिषदेने 'तत्त्ववेध' ही स्मरणिका प्रकाशित केली.[]परिषदेची २०१४ अखेर ३१ अधिवेशने झाली आहेत.त्यांचे तपशील परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.[]

महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन

महाराष्ट्रात तत्त्वज्ञान परिषदेचे स्थापना अधिवेशन इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशन पुणे येथील सभागृहात २० व २१ नोव्हेंबर १९८२ रोजी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या स्थापना अधिवेशनात तीन विषयांवर परिसंवाद झाले.

पहिला परिसंवाद : नैतिक मूल्यांवरील भारतीय चिंतन

सहभाग :

  1. प्रा. श्री. ह. दीक्षित - कोल्हापूर
  2. प्रा. ना. शा. द्रविड - नागपूर
  3. डॉ. शि. स. अंतरकर - गोवा
  4. प्रा. रमाकांत सिनारी - मुंबई
  5. प्रा. द. शा. जकाते - अमरावती

दुसरा परिसंवाद : सामाजिक न्याय

सहभाग :

  1. प्रा. मो. प्र. मराठे - पुणे
  2. डॉ. ज. वा. जोशी - सांगली
  3. प्रा. भा. ग. केतकर- धुळे

तिसरा परिसंवाद : स्वातंत्र्याची संकल्पना

(तपशील उपलब्ध नाही)

या अधिवेनातील परिसंवादात सादर केले गेलेले काही निबंध परार्श खंड ४:अंक ४ (फेब्रुवारी १९८३) या अंकात प्रसिद्ध झाले.

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-31 रोजी पाहिले.
  3. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-31 रोजी पाहिले.