Jump to content

महाराष्ट्र ओपन

एसडॅट टेनिस स्टेडियम
२०११ चेन्नई ओपनमधील दुहेरी सामन्यामध्ये लिअँडर पेसमहेश भूपती

महाराष्ट्र ओपन ही भारताच्या पुणे शहरामध्ये आयोजित केली जाणारी एक वार्षिक पुरुष टेनिस स्पर्धा आहे. पुण्यातील हार्ड कोर्टवर खेळवली जाणारी ही स्पर्धा ए.टी.पी.च्या ए.टी.पी. वर्ल्ड टूर २५० सीरीज ह्या शृंखलेचा भाग आहे. १९९६ साली सर्वप्रथम ह्या स्पर्धेचे आयोजन केले गेले. आजवर रफायेल नदाल, बोरिस बेकर, रिचर्ड क्रायजेक इत्यादी प्रसिद्ध टेनिसपटूंनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.

प्रारंभिक कार्यक्रम नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ते चेन्नईला हलवण्यात आले होते आणि २०१८ पासून ही स्पर्धा पुण्यात गेले, जिथे ते जानेवारीमध्ये आयोजित केले जाते. [] []

महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन या संस्थांद्वारे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. []

गतविजेते

एकेरी

वर्ष विजेता
२०२०चेक प्रजासत्ताक जिरी वेसेली
२०१९दक्षिण आफ्रिका केव्हिन अँडरसन
२०१८फ्रान्स जिल सिमाँ
२०१७स्पेन रॉबर्टो बॉटिस्टा आगुत
२०१६स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका
२०१५स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका
२०१४स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका
२०१३सर्बिया यांको टिप्सारेविच
२०१२कॅनडा मिलोस राओनिक
२०११स्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका
२०१०क्रोएशिया मारिन चिलिच
२००९क्रोएशिया मारिन चिलिच
२००८रशिया मिखाइल यूझनी
०२००७बेल्जियम जाविए मॅलिस
२००६क्रोएशिया इव्हान ल्युबिचिच
२००५स्पेन कार्लोस मोया
२००४स्पेन कार्लोस मोया
२००३थायलंड पारादोर्न श्रीचफन
२००२आर्जेन्टिना ग्वियेर्मो कॅन्यास
२००१चेक प्रजासत्ताक मिकाल तबारा
२०००फ्रान्स जेरोम गोल्मर
१९९९झिम्बाब्वे बायरन ब्लॅक
१९९८ऑस्ट्रेलिया पॅट्रिक राफ्टर
१९९७स्वीडन मिकाएल टिलस्ट्रॉम
१९९६स्वीडन थॉमस एंक्विस्ट

भारताच्या सोमदेव देववर्मनने २००९ साली उपविजेतेपद मिळवले होते.

दुहेरी

दुहेरीमध्ये ही स्पर्धा भारताच्या लिअँडर पेसमहेश भूपती ह्या जोडीने पाच वेळा (१९९७, १९९८, १९९९, २००२ व २०११) जिंकली असून २०१२ साली पेसने यांको टिप्सारेविच सोबत दुहेरीमधील अजिंक्यपद मिळवले.


संदर्भ

  1. ^ Marar, Nandakumar (6 December 2017). "India's ATP event becomes Tata Open again". The Hindu. 23 October 2018 रोजी पाहिले.
  2. ^ [१]
  3. ^ "Change in ATP schedule means no big stars for India's only ATP event". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-02-02. 2021-09-16 रोजी पाहिले.

बाह्य दुवे