Jump to content

महाराष्ट्रातील लोककला

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली.

कीर्तन ,दशावतार तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा -उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य ,बहुरूपी , डोंबाऱ्याचे खेळ,पोवाडा, गोंधळ ,जागरण, कलगीतुरा, लळीत ,बहुरूपे ,कुडमुडे जोशी, वासुदेव, यात लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.लोककलेत पुढील प्रकारांचा समावेश होतो-

लोकगीत

ही गीते बरेचदा चार ते पाच स्वरातच गायली जातात, त्यामुळे म्हणताना ती तुलनेने सोपी जातात,दादरा आणि केरवा या तालाच्या पलीकडे यांची लय जात नाही. सामुदायिक जीवनाला उठाव देणारा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. लोकगीते गाताना होणारा शब्दांचा उच्चार हा विशिष्ट ह्रस्व –दीर्घ पद्धतीने होणारा असल्याने ते ऐकताना मनाला विशेष आनंद होतो.[]

वासुदेवाची गाणी

वासुदेव हा लोकसंस्कृतीचा एक उपासक मानला आहे.

अवो जनाबाईंच्या भक्ती –देव गुंतला
जनामातेला काम भारी
घालिते दळण जात्यांवरी विट्ठला या हो लौकरी

यावे यावे जगजेठी
तुमच्या नावाची आवड मोठी
खुटीला घालून मिठी

दोन बोलू सुखाच्या गोष्टी
अवो जनाबाईंच्या भक्ती – देव गुंतला ..[]

भीमगीते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर चचलेल्या गितांना भीमगीते असे म्हणतात. मराठी भाषेत असंख्य भीमगीते गायली गेली आहेत. इतर अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा भीमगीतांती रचना झालेली आहे.भीमगीताचे वातावरण चैतन्य निर्माण करते. समोरच्या गर्दीला गाण्यातून बाबासाहेब समजावून सांगणे आणि परिवर्तन घडवणे यासारखा दुसरा आनंद नाही’, गायिका पंचशिला भालेराव हिची रोखठोक भूमिका नेहमीच आश्वासक वाटते. फिल्मी गाण्यांचा तिला कधीच मोह झाला नाही. खडतर परिस्थितीवर मात करून हजारो कार्यक्रम गाजवणारी ही सामर्थ्यशाली गायिका आहे.

गोकुळीचा चोर

गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥

अवचित कान्हा घरात शिरतो दही दूध तूप चोरूनी खातो धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥

पाण्यासी जाता घागर फोडी
भर रस्त्यावर पदराला ओढी
लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥

मुरलीधर हा नटखट भारी
खट्याळ काळा कृष्ण मुरारी
सोडू नका याला आता सोडू नका याला
चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥

उगवत्या नारायणा आधी उगव माझ्या दारी

माज्या त्या बाळासंग दुधा तुपाची कर न्ह्यारी


पोथी पुस्तक  वाचताना  बाई कानीचा डूल हाले

सावळा बाळराजा सये कागद संग बोले


सरी बिंदलीच सोनं बाई सवाई सातरंग

इंद्रसभेचा सोनार ग  हरी घडविता झाला दंग


[१]

काळी चोळी , मोती जाळी

हार गुंफी गळया घाली

काळी करटूली कारली

वटी मैनाची भरली

आमी गौळणी बायका


इंद्रावनी गोष्ट  सांग

दिल्लीच्या नायका

झाडावरी मोर काय

बोलतो ऐका []

गोंधळ

आई जगदंबा रेणूका सुंदरी

नांदसी तुळजापुरी

धरित्री गांजली दैत्याने

बुडाले अवघे जन जी ||

तेहतीस कोटी देव मिळून

केले अंबेचे स्मरण जी

निघाली ग माय तेव्हा होमातुन

महिषासुर मर्दिला तिने जी||
[]

हे सुद्धा पहा

  • भोंडल्याची गाणी

संदर्भ

  1. ^ लोकसंगीत – डॉ. सरोजिनी बाबर
  2. ^ एक होता राजा सरोजिनी बाबर 
  3. ^ लोकसंगीत – डॉ. बाबर सरोजिनी
  4. ^ बाबर सरोजिनी-एक होता राजा

चित्रदालन