Jump to content

महाबळेश्वर सैल


महाबळेश्वर सैल
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठी, कोकणी
साहित्य प्रकारकथा
कादंबरी

महाबळेश्वर सैल (जन्म - ४ ऑगस्ट, इ.स. १९४३ माजळी, कारवार) हे गोव्यात स्थायिक असलेले एक माजी सैनिक तसेच कोकणी, मराठी कथालेखक, निबंधलेखक व कादंबरीकार आहेत. त्यांचे कोकणीत अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या आणि कादंबरिका प्रकाशित झाल्या आहेत.त्यांनी कोकणीत 'निसर्ग साहित्य' हा नवा प्रवाह सुरू केला.१९६५ च्या भारत-पाक युद्धात त्यांचा सहभाग होता. १९६३-६४ मध्ये इस्रायल-इजिप्त सीमेवर युनोतर्फे शांतिसैनिक म्हणूनही ते गेले होते.

महाबळेश्वर सैल यांचे प्रकाशित साहित्य

  • उन्हातली माणसं (कादंबरी)
  • काळी गंगा (लेखकाची ही पहिली कादंबरी)
  • खोल खोल मुळा (कादंबरी)
  • तांडव (कादंबरी- मराठी आणि कोकणी दोन्ही भाषांतून लिहिलेली कादंबरी) राजहंस प्रकाशन, पुणे[]
  • नको जाळूं माझं घरटं
  • निमाणो अश्वत्थामा (शेवटचा अश्वत्थामा) (कथासंग्रह)
  • हावठण (कादंबरी)

महाबळेश्वर सैल यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार

  • सरस्वती सन्मान

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ डॉ. सोमनाथ कोमरपंत. "लेखकाचा कट्टा : माती आणि माणसांत घट्ट मूळं रुजलेला लेखक". १४ ऑगस्ट, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)