महाड विधानसभा मतदारसंघ
महाड विधानसभा मतदारसंघ - १९४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, महाड मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर ही दोन तालुके आणि माणगांव तालुक्यातील निजामपूर आणि गोरेगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. महाड हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे भरतशेठ मारुती गोगावले हे महाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | भरतशेठ मारुती गोगावले | शिवसेना | |
२०१४ | भरत मारुती गोगावले | शिवसेना | |
२००९ | भरतशेट गोगावले | शिवसेना |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
महाड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
भारतसेठ गोगावाले | शिवसेना | ८५६५० |
जगताप माणिक मोतीराम | राष्ट्रवादी | ७१६०० |
जाधव किशोर नारायण | मनसे | २५४० |
सोंडकर राजेंद्र गणपत | अपक्ष | २३१४ |
मंगेश सुदाम तांबे | अपक्ष | १३३४ |
मधुकर गंगाराम गायकवाड | बसपा | १३३२ |
शेखर गणेश ताडफळे | अपक्ष | ४०५ |
कुंदन केरु HATE | भाबम | ४०४ |
प्रभाकर मोरे | अपक्ष | ३८० |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".