Jump to content

महाड

महाड हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर तर पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे चवदार तळे सत्याग्रह केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे.

महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे.

इतिहास :

इतिहासात महाडचा सर्वात जुना संदर्भ ई.स.पु. २२५ मध्ये आढळतो.

ई.स. १३० मधे महाडवर बौद्ध धर्मिय कंभोजवंशिय राजा विष्णू पुलित यांचे राज्य होते.महाडची गांधारपाले बौद्ध लेणी त्याच्या राजवटित निर्माण केली गेली.तसा शिलालेख तेथे आहे.

महाडवर मुख्यत: मौर्य सम्राट,कंभोज,सातवाहन,क्षात्रप,वाकाटक,शिलाहार,देवगिरीचे यादव,निजामशाह,आदिलशाह,शिवाजी महाराज,पोर्तुगिज,पेशवे,सिद्दि यांची राजवट झाली आहे.ई.स.१८१८मधे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड जिंकले,१९४७ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अमलाखाली होते.[]

ईसवी सनाच्या पहिल्या शतकापासुन महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापार केंद्र म्हणुन प्रसिद्ध होते.त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट् वरून पडले.महा-मोठि व हट्-बाजारपेठ,मोठी बाजारपेठ.

देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली.तेंव्हा एक व्यापार केंद्र व बंदर असलेल्या महाडची जास्त भरभराट झाली.

महाडचा कोट हा छोटेखानी किल्ला आदिलशाहि काळात बांधला गेला.१७७४ मधे नाना फडणविसांनी कोटाची दुरूस्ती करून तोफा तैैैनात केल्या होत्या.

१८८१ च्या खानेसुमारी प्रमाणे महाडची लोकसंख्या ६८०४ होती.

इंग्रजांनी १८६६ मधे महाड नगरपालिका स्थापन केली.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

नागरी सुविधा

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

प्रेक्षणीय स्थळे

महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे:

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
  • चवदार तळे
  • रायगड किल्ला
  • श्री वीरेश्वर महाराज मंदिर (शिवकालीन मंदिर)
  • सव येथील गरम पाण्याचे झरे
  • गांधारपाले बुद्धकालीन लेण्या
  • शिवथरघळ (संत रामदास यांनी दासबोध या गुंफेत लिहिला).
  • रम्य धबधबा व नैसर्गिक हिरवळ
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कार्यभूमी.
  • नदीवरचे जुने बंदर. या बंदरातून छोटे व्यापारी किंवा प्रवासी अरबी समुद्रात जात असत.
  • वरदायनी माता मंदिर (गाव वाळणकोंडी)
  • केंबुर्ली येथील मनोरम धबधबा.
  • कोतुर्डे येथील धरण
  • दापोली येथील धबधबे (वाळण दापोली )
  • किल्ले लिंगाणा (दापोली... किल्ले रायगड पासून ९ किलोमीटर अंतरावर)

हे सुद्धा पहा

पुस्तके

  • ऐतिहासिक महाड (अशोक बेंडखळे)

बाह्य दुवे

  1. ^ Mahārāshṭra Rājya gêjheṭiara. Darśanikā Vibhāga, Mahārāshṭra Śāsana. 1900.
  2. ^ /https://www.bankofindia.co.in/