Jump to content

महाकाली नदी (उत्तराखंड)


उत्तराखंडातल्या या महाकाली नदीला शारदा नदी, काली नदी, काली गंगा ही अन्य नावे आहेत. ही नदी भारत व नेपाळ या देशांची सीमा दर्शवते. नदीचा उगम हिमालय पर्वतात ३,६०० मीटर उंचीवर असलेल्या कालापानी नावाच्या गावाजवळ होतो. हे गाव उत्तराखंड राज्याच्या पिठोरगड जिल्ह्यात आहे.

कूटी, धौलीगंगा, गोरी, चमेलिया, रामगुण, लढ़िया या महाकाली नदीच्या उपनद्या आहेत. उत्तर प्रदेशातील बहरिच जिल्ह्यात शरयू नदीला मिळाल्यावर त्यांचा गंगा नदीशी संगम होतो.