महम्मद अली
महम्मद अली (जन्मनावः कॅशियस मार्सेलस क्ले, जुनियर; जानेवारी १७, इ.स. १९४२:लुईव्हिल, केंटकी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ३ जून, २०१६:फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका) हा एक श्रेष्ठ अमेरिकी मुष्टियोद्धा, ७ वेळचा वर्ल्ड हेव्हीवेट चॅंपियन व ऑलिंपिक हेव्हीवेट सुवर्णपदकाचा मुष्टियुद्ध विजेता होता. १९९९ साली म अलिस बीबीसी ने स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्पोर्ट्समन ऑफ़ द सेन्चुरी किंवा शतकातील सर्वष्रेष्ठ खेळाडू म्हणून घोषित केले. अलिचा जन्म लुईव्हिल, केंटकी येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव मारकेलास क्ले सिनिअर होते. त्यावरून अलीचे नाव मार्सेलस क्ले, ज्युनिअर असे ठेवण्यात आले. क्यासियलास हे नाव गुलामगिरीच्या प्रथेविरुद्ध संघर्ष करणारे क्यासियलास क्ले यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. अली १९६४ साली 'नेशन ऑफ़ इस्लाम' या संघटनेचा सदस्य झाला. १९७५ साली त्याने इस्लाम धर्माचा स्वीकार केला.
बालपण
अलीचा जन्म १७ जानेवारी १९४२ रोजी झाला. त्याचे वडील क्ले सिनिअर हे फ़लक (साईनबोर्ड व बिलबोर्ड) बनविण्याचे काम करित असत. आई 'ओडिसा ग्लॅडी क्ले' गृहिणी होती. वडिल क्ले सिनिअर जरी विचाराने मेथडिस्ट असले तरी त्यांनी आपल्या मुलाचा ख्रिश्चन रीतीप्रमाणे बाप्तिस्मा करण्याची पत्निस अनुमती दिली होती.
मुष्टियुद्धाची सुरुवात
अलीच्या कारकिर्दीची सुरुवात नाट्यमय होती. १९५४ साली एका दिवशी अलीची सायकल चोरीस गेली; तेव्हा अलीने पोलीस आधिकरी मार्टिन यांच्याकडे चोराला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती. आधिकाड़्याने अलीला सांगितले की मारायचे असेल तर लढाई व्यवस्थित यायला हवी. दुसऱ्या दिवसापासून अलीने मार्टिन कडून मुष्टियुद्धाचे धडे घेण्यास सुरुवात केली. १९६० साली अलीने ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले. ६'३" उंचीच्या अलीची खासियत म्हणजे तो खेळताना कधीही हात चेह-यासमोर नव्हे तर शरिराजवळ ठेवित असत. प्रतिस्पर्ध्याचा हल्ला थोपविण्यासाठी अंगभूत तडक प्रतिकियेवर भरोसा ठेवत. २९-१०-१९६० रोजी त्यांनी पहिली व्यावसायिक लढत जिंकली. १९६० -१९६३ मध्ये त्यांनी १९ लढती जिंकल्या त्यातील १५ नॉकाआउट होत्या. यातील सर्वांत संस्मरणिय लढत म्हणजे डग जोन्स विरुद्धची एक वादग्रस्त लढत.
पहिली लढत
या नंतर अली हे मुष्टियुद्धामधील तत्कालिन क्रमांक एक मुष्टियोद्धे सनी लिस्टन यांचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जाऊ लागले. लिस्टन कडे अती आत्मविश्वास होता. अलीच्या बुटकेपणामुळे ते लिस्टनेरच्या ढुषीपासून वाचले; त्याचवेळेस ते लिस्टनरला ढुषी मारू शकत होते. ही लढत अलीच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा होती.