Jump to content

महदंबा साहित्य संमेलन

आद्य मराठी कवयित्रीच्या नावाचे पहिले महदंबा साहित्य संमेलन जालना जिल्ह्यातील दहीपुरी येथे १८-१९-२० ऑक्टोबर २०१४ या काळात भरवले गेले होते. महानुभाव साहित्य, शिक्षण, संशोधन प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या या संमेलनाच्या स्थळाला आचार्य भानुकवी जामोदेकर साहित्य नगरी असे नाव दिले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके असून या साहित्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक महंत बाभुळगावकरशास्त्री यांनी केले होते. अर्चनाताई कुरेकर यांनी महदंबेचे धवळे या विषयावरील परिसंवादात अापला सहभाग नोंदवला होता. या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रा. भारतभूषणशास्त्री यांनी केले होते.

दुसरे आद्य कवयित्री महदंबा साहित्य संमेलन हे अंबड तालुक्यातील पारनेर येथे भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. नारायण खरात होते. या संमेलनाचे उदघाटन लीलाताई भानुकवी जमोदेकर यांनी केले होते. यावेळी सुदामराजशास्त्री यांनी आचार्य भानुकवी यांच्या साहित्य कृतींवर प्रकाश टाकला. प्रा. भारतभूषणशास्त्री यांनी जालना जिल्ह्यातील महानुभाव साहित्यसंपदा यांवर प्रकाश टाकला.

पहा : साहित्य संमेलने; महानुभाव साहित्य संमेलन