Jump to content

मळगाव धबधबा

मळगाव धबधबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव घाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आहे. हा सावंतवाडीजवळ आहे. सातार्ड्यातून मळेगावच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी-गोवा रस्त्यावर मळगाव वसले आहे. झाराप-पत्रादेवी हायवेपासून हा धबधबा हाकेच्या अंतरावर आहे. झाराप हे कोकण रेल्वेवरील कुडाळ स्ठेशन व सावंतवाडी स्टेशन यांच्या मधले रेल्वे स्थानक आहे. झाराप-पत्रादेवी हा चौपदरी महामार्ग आहे.